Parat Ekada Buddha Samjun Ghetana (परत एकदा बुद्ध समजुन घेताना) By Sarla Bhirud

Regular price Rs. 280.00
Sale price Rs. 280.00 Regular price Rs. 350.00

बुध्द किती प्राचीन आहे, मग आता त्याची काय गरज आहे? बुध्द म्हणजे निर्वाण, दुःख, दुखाची कारणे सांगणारा महात्मा, अहिंसा एवढाच अर्थ नसून त्यापलिकडे अत्यंत व्यापक स्वरूप आहे. बुध्दांचा प्रवास माणूस म्हणून आपल्याला पडलेल्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे, हे ज्या अभ्यासकांना उमगले त्यांच्याच विचारांचा सारांश या पुस्तकात घेतला आहे, तो कदाचित खूप पुनरावृत्ती वाटेल पण जरूरीचे आहे विशेषतः जेव्हा महाराष्ट्रात बौध्द विचार एका चौकटीत बांधण्यात आली आहेत..... प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकेशी संबंध असला पाहिजे त्याचा ईश्वर किंवा आत्म स्वर्ग आणि पृथ्वी याविषयीच्या सिद्धांतांची आणि कल्पनांशी संबंध असता कामा नये ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानण अयोग्य आहे आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मांडणे चूक आहेत. खरा धर्म माणसाच्या मनात बसतो. शास्त्रात नाही. मनुष्य व निती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे जर तसे नसेल तर धर्मही एकूण अंधश्रद्धा ठरेल. जगात ईश्वर नसल्यामुळे नीतीही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेशी नाही तर जीवनाचा नियम आणि कायदा असावा. धर्माची कार्य जगाची पुनर्रचना करणे आणि माणसाला सुखी बनवणे हे आहे, त्याचा आरंभ आणि अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे. हितसंबंधांच्या कलहामुळे जगात दुःख आहे आणि तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुकरण आहे. सर्व मानव समान आहेत. मानवाचे मूल्यमापन त्यांच्या जन्माने नसून त्याच्या कर्तुत्वाने होते. महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श उच्च घराण्यात जन्म नव्हे...... अशी अनेक तत्व जी वास्तविक जीवनाशी जोडलेली आहेत. ती बुद्ध आपल्याला सांगतात. जी कल्पनांमध्ये नाही, तर वास्तविक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे बुद्ध हा परत परत समजून घ्यायला हवा आणि तो तत्कालीन परिस्थिती गरजेचा आहे म्हणून ही उठाठेव.