Netaka Prapanch Va Samajseva ( नेटका प्रपंच व समाजसेवा ) By H A Bhave
नेटका प्रपंच व समाजसेवा
कुटुंब, नाती, प्रेम, संस्कार आणि समाजसेवा या पाच गोष्टी माणसाचे संपूर्ण जीवन घडवतात. ह. अ. भावे लिखित नेटका प्रपंच व समाजसेवा हे पुस्तक मानवी मनातील वासनांचे स्वरूप, त्यांचे रूपांतर, तसेच तरुणांनी कोणत्या मार्गावर चालावे याची नेमकी दिशा देते.
लेखक सांगतात की प्रत्येक माणसात गुणदोषांचा संगम असतो; पण शहाणा माणूस वाईट वासनांचेही सात्विकीकरण करून जीवन सुंदर करतो. प्रेम, पती-पत्नीचे नाते, कुटुंबातील नाती, स्त्रीचे स्थान, पत्रिका जुळवणीचे भ्रम, रक्तगटाचे विज्ञान, गरीब,श्रीमंत यांचे चक्र… ही सगळी मानवी जीवनातील मूळ तत्त्वे लेखक अत्यंत सोप्या, थेट शैलीत उलगडतात .
या पुस्तकाचे मध्यवर्ती तत्व अगदी साधे आहे.
'मानवी समाज परोपकार आणि कृतज्ञतेवर चालतो'.
ही दोन चाके योग्य दिशेने फिरली तर माणसाचेही, कुटुंबाचेही, समाजाचेही हित साधते. हे पुस्तक तरुणांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि समाजात काहीतरी बदल घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरते.