Navya Shatakacha Mantra ( नव्या शतकाचा मंत्र ) By H.A.Bhave
नव्या शतकाचा मंत्र
ह. अ. भावे हे मराठीतील विचारवंत लेखक असून व्यवसाय, चारित्र्य, मूल्यनिष्ठा आणि मानवी वर्तन यांवर त्यांनी अनेक प्रभावी लेखन केले आहे. तरुणांना योग्य दिशा देणे आणि समाजात मूल्याधिष्ठित विचार निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. 21 व्या शतकात झपाट्याने बदलणाऱ्या जगात तरुणांनी कोणता मार्ग निवडावा ? यशस्वी जीवनाचे खरे तत्त्व काय ? इत्यादी प्रश्नांचा उहापोह या पुस्तकामध्ये केला आहे. व्यवसायात, नात्यांत आणि समाजात टिकून राहण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे ? तसेच सोपी भाषा, प्रभावी लेखन आणि प्रेरणादायी संदेशांनी परिपूर्ण अशाप्रकारे ह.अ. भावे लिखित ‘नव्या शतकाचा मंत्र’ हे पुस्तक आजच्या तरुणांसाठी एक मौल्यवान मार्गदर्शनग्रंथ आहे. काटकसर, प्रामाणिकपणा, निष्ठा, चारित्र्य, उदात्त विचार, शुद्ध साधने आणि शुद्ध आचरण या चिरंतन मूल्यांचा 21 व्या शतकातील आधुनिक व्यावसायिक जीवनात कसा वापर करायचा, याचा सखोल विचार या पुस्तकात मांडलेला आहे. संगणकयुग, जागतिक स्पर्धा, जाहिरातशक्ती, भांडवल, पतसामर्थ्य आणि व्यवसायनिष्ठा यांची महत्त्वे सोप्या भाषेत स्पष्ट होतात.
रामदासस्वामी, शिवाजी महाराज, टिळक आणि महात्मा फुले यांच्यासारख्या आदर्शांमधून प्रेरणा घेत, तरुणांनी भविष्य घडवण्यासाठी कोणता दृष्टिकोन ठेवावा, याचे चिंतनशील मार्गदर्शन या पुस्तकात मिळते.