Navajeevan (Resurrection) By Leo Tolstoy, Translated By Prof V S Apte

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price
Save 0

कौंट लिओ निकोलायविच टॉलस्टॉय (१८२८ ते १९१०) हा जागतिक कीर्तीचा लेखक आणि विचारवंत. त्यांच्या 'बॉर अँण्ड पीस' (१८६८), 'ए कन्फेशन' (१८८२) या फार गाजलेल्या कादंबऱ्या. १८९९ च्या शेवटच्या काही महिन्यांत त्याने रिसरेक्शन' ही कादंबरी पूर्ण करून प्रसिद्ध केली. जवळ जवळ सहाशे पृष्ठांची ही प्रदीर्घ कथा. त्या कथेत रशियन समाजाचे यथातथ्य चित्रण आहे. टॉलस्टॉय म्हणत असे की उत्कृष्ट कलेचे महत्त्वाचे कोणते गमक असेल तर हे की त्या कलेत त्या कलाकार निर्मात्याचे विचार व भावना स्पष्टपणे प्रतिबिंबित व्हाव्यात. त्याच्या या मताप्रमाणे, 'रिसरेक्शनमध्ये टॉलस्टॉयचे संपूर्ण व्यक्तिदर्शन झाले आहे.
या कादंबरीत त्या देशातील धर्म व अर्थव्यवस्थेवर जी प्रखर टीका आहे त्यामुळे त्याला रशियातील धर्मसंस्थेने १९०१ मध्ये बहिष्कृत केले. एक उमदा श्रीमत तरूण एका खटल्यात ज्यूरर (पंच) म्हणून काम करीत असताना त्याला त्या खटल्यातील आरोपी स्त्रीची ओळख पटते. त्याला या दुःखद घटनेतून आपल्या जीवनात काही चांगले करावे, काही चांगल्या मूल्यांना जपावे, काही सामाजिक परिवर्तन घडवून आणावे असे वाटते. नव्या शुद्ध उदात्त जीवनाचा शोध घेण्याची त्याने जी धडपड केली त्याचा या कादंबरीत उद्बोधक, संयमित व तेवढाच मनोरंजक आढावा आहे. विदग्ध इंग्रजीत ज्या कथा-कादंबऱ्या गाजल्या, सर्व वाचकांना आवडल्या व ज्या अमर वाङमयाचे भूषण ठरल्या त्यापैकी काही कथा संक्षेपाने उदयोन्मुख पिढीला पुन्हा सांगाव्या या हेतूने टॉलस्टॉयची रिसरेक्शन नवजीवन- ही कथा वाचकांना सादर केली आहे.