Mojmapancha Itihas Va Vikas Ani Dashamanpaddhati (Metric Paddhat) by H A Bhave

Regular price Rs. 50.00
Sale price Rs. 50.00 Regular price
Save 0
वस्तू व इतर गोष्टी मोजायला रानटी अवस्थेपासूनच सुरुवात केली. मोजमापांच्या साधनांची उत्क्रांती कशी झाली याचा इतिहास मनोरंजक आहे. एकच उदाहरण घेऊ. आजही आपण फळे, डझनात मोजतो. डड़ान म्हणजे १२ नग. हे पाप रानात राहणाऱ्या माणसाला काही लक्ष वर्षांपासून माहीत आहे. तो रानात फळे तोडायला जायचा व फळांची वाटणी करायचा तेव्हा अंगठा सोडून हाताच्या बोटांची पेरे मोजत असे. ती पेरे १२ आहेत. त्यामुळे 'डझन' हे माप माणसाच्या मनात पक्के रुजले, ते अगदी आजपर्यंत. हे १२ चे मूलभूत माप माणसाला सहज सापडले व त्याचा वापर मानव आजही विविध तऱ्हेने करतो. दिवसाचे तास १२ असतात. वर्तुळाचे अंश ३६० हे बाराच्या पटीतच आहेत. १२ वर्षांनाच एक तप म्हणतात. भारतीय पंचांगात वर्षाचे चक्र ६० वर्षांचे असते, तेही १२ च्या पटीतच.

इतिहासकाळात निरनिराळ्या देशांत अनेक तऱ्हेची वजने, मापे प्रचारात आली. लांबीमापनासाठी राजाच्या हाताचे अंतर प्रमाणभूत धरण्यात आले. १७८९ साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि वजनामापांची दशांशावर आधारित 'मेट्रिक पद्धत' तेथे प्रचारात आली. हळूहळू जगभरच मेट्रिक पद्धतीचा स्वीकार सर्व राष्ट्रांनी केला. इंग्लंडमध्ये १९७१ मध्ये तर अमेरिकेत १९७५ मध्ये मेट्रिक पद्धतीविषयी कायदे मंजूर झाले