{"product_id":"mhani-vakysampraday-shabdvichar-h-a-bhave-marathi","title":"Mhanee Vakysampraday Va Shabdvichar (म्हणी, वाक्संप्रदाय व शब्दविचार) By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eइयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उपयुक्त, \u003cstrong\u003eम्हणी, वाक्संप्रदाय आणि शब्दविचार\u003c\/strong\u003e एकाच छोट्या पुस्तकात. ह. अ. भावे यांनी संग्रहित केलेले हे पुस्तक मराठी व्याकरण आणि भाषासौंदर्याचा पाया पक्का करते.\u003c\/p\u003e\u003cp\u003eम्हणी आणि वाक्संप्रदाय ही भाषेची भूषणे आहेत. अगदी मार्मिकपणे शक्य तितक्या मोजक्या शब्दांत सत्य प्रगट करणारे वचन म्हणजे म्हण. ती सूत्ररूपात असते, म्हणजे थोड्या शब्दांत खूप मोठा अर्थ स्पष्ट करते. म्हण व वाक्प्रचार म्हणजे लोकांना आलेले अनुभव थोडक्या शब्दांत व्यक्त करणे होय. अनेकदा म्हणीमागे एखादी कथाही असते. म्हण हा शब्द संस्कृत 'भण्' (बोलणे) या धातूपासून आला आहे. आभाणक म्हणजे म्हण. लोकांनी वारंवार म्हटलेले वचन किंवा वाक्य असा त्या शब्दाचा अर्थ आहे. सार्वत्रिकता किंवा लोकप्रियता हा गुण म्हणीमध्ये आवश्यक आहे. म्हणी या अलिखित म्हणजे तोंडी परंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत येतात. त्या लोकांच्या तोंडी कायम राहाव्यात म्हणून त्यात यमक, प्रास प्रायः आढळतात. उदा. अति तेथे माती, फिरे तो चरे. पुष्कळ वेळा म्हणीत अतिशयोक्ती आढळते. आपले आचारविचार, वागणूक, गुण व अवगुण, दोष यांचे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. म्हणून वाङ्मयात म्हणींचे महत्त्व फार आहे. न. चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या केली आहे, ती अशी: 'म्हण म्हणजे चिमुकले, चतुरपणाचे व चटकदार वचन.'\u003c\/p\u003e\u003cp\u003eमराठी म्हणींचा पहिला संग्रह रेव्हरंड मॅनवॉरिंग या इंग्रज मिशनऱ्याने केला. तो १८९९ मध्ये इंग्लंडमध्ये छापला गेला. त्यानंतर 'आनंद' मासिकाचे संपादक वा. गो. आपटे यांनी १९२० मध्ये \u003ca href=\"\/products\/marathi-bhasheche-sampraday-mhani-v-g-apte\"\u003eमराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी\u003c\/a\u003e हे पुस्तक प्रसिद्ध केले. मराठी भाषेतील म्हणींचा सर्वांत मोठा संग्रह 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' या नावाने कोशकार दाते-कर्वे यांनी १९४४ ते ४७ या दरम्यान प्रसिद्ध केला. ह्यात मोठ्या आकाराची १४०० पृष्ठे आहेत. म्हणी व वाक्संप्रदाय ह्यांचा इतका मोठा कोश कोणत्याही भारतीय भाषेत नाही. आपटे आणि दाते-कर्वे यांची वरील दोन पुस्तके वरदा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.\u003c\/p\u003e\u003ch3\u003eया पुस्तकात काय आहे? \/ What's Inside\u003c\/h3\u003e\u003cul\u003e\n\u003cli\u003eपहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमातील म्हणी व वाक्संप्रदाय, अर्थासह\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eदोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांत विचारल्या जाणाऱ्या म्हणी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eशब्दविचार: विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, जोडशब्द\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसंधी व संधींचे प्रकार\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\u003ch3\u003eBook Details \/ पुस्तकाची माहिती\u003c\/h3\u003e\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eसंग्राहक \/ Compiler:\u003c\/strong\u003e ह. अ. भावे (H. A. Bhave)\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभाषा \/ Language:\u003c\/strong\u003e मराठी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eवयोगट \/ For:\u003c\/strong\u003e इयत्ता १ ली ते ७ वी, शिष्यवृत्ती परीक्षा\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eबांधणी \/ Format:\u003c\/strong\u003e Paperback\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eप्रकाशक \/ Publisher:\u003c\/strong\u003e वरदा प्रकाशन, पुणे\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eIn English:\u003c\/strong\u003e A compact Marathi guide to proverbs (mhani), idioms (vakysampraday) and word study (shabdvichar) for students of Std 1–7 and both scholarship exams, compiled by H. A. Bhave.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eSee also:\u003c\/strong\u003e \u003ca href=\"\/products\/marathi-bhasheche-sampraday-mhani-v-g-apte\"\u003eMarathi Bhasheche Sampraday Va Mhani — V. G. Apte\u003c\/a\u003e (2,066 mhani with English equivalents) · \u003ca href=\"\/products\/sarth-sanskrut-mhani-vakprachar-kosh-h-a-bhave\"\u003eSarth Sanskrut Mhani Ani Vakprachar Kosh — H. A. Bhave\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\u003ch3\u003eम्हणी, वाक्संप्रदाय व शब्दविचार — वारंवार विचारले जाणारे प्रश्न \/ FAQ\u003c\/h3\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: हे पुस्तक कोणत्या इयत्तेसाठी आहे? \/ Which class is it for?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: इयत्ता १ ली ते ७ वी आणि दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांसाठी.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: म्हण आणि वाक्संप्रदाय यात फरक काय? \/ Mhan vs vakysampraday?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: म्हण हे अनुभवातून आलेले पूर्ण, बोधपर वचन असते. वाक्संप्रदाय (वाक्प्रचार) हा शब्दसमूह असतो, ज्याचा अर्थ शब्दशः न घेता रूढ अर्थाने घेतला जातो.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: शब्दविचार विभागात काय आहे? \/ What is in Shabdvichar?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, जोडशब्द आणि संधीचे प्रकार.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: हे पुस्तक कुठे मिळेल? \/ Where to buy?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: म्हणी, वाक्संप्रदाय व शब्दविचार varadabooks.com वर उपलब्ध आहे. घरपोच डिलिव्हरी मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Varada Prakashan","offer_id":46040942444859,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0739\/6189\/8299\/files\/mediamodifier_image_-_2026-07-07T130736.691.jpg?v=1783409905","url":"https:\/\/varadabooks.com\/products\/mhani-vakysampraday-shabdvichar-h-a-bhave-marathi","provider":"Varada Books","version":"1.0","type":"link"}