Mhanee Vakysampraday Va Shabdvichar (म्हणी, वाक्संप्रदाय व शब्दविचार) By H. A. Bhave
    Regular price
    
        Rs. 50.00
      
    Sale price
    
        Rs. 50.00
      
      Regular price
      
            Save 0
          
    म्हणी आणि वाक्संप्रदाय ही भाषेची भूषणे आहेत. अगदी मार्मिकपणे शक्य तितक्या मोजक्या शब्दांत सत्य प्रगट करणारे वचन म्हणजे म्हण. ती सूत्ररूपात असते, म्हणजे थोड्या शब्दांत खूप मोठा अर्थ स्पष्ट करते. म्हण व वाक्प्रचार म्हणजे लोकांना आलेले अनुभव थोडक्या शब्दांत व्यक्त करणे होय. अनेकदा म्हणीमागे एखादी कथाही असते. म्हणीमध्ये वाक्प्रचारांचा समावेश असतोच. म्हण हा शब्द संस्कृत 'भण), (बोलणे) या धातूपासून आला आहे. आभणूक म्हणजे म्हण. लोकांनी वारंवार म्हटलेले वचन किंवा वाक्य असा त्या शब्दाचा अर्थ आहे. सार्वत्रिकता किंवा लोकप्रियता हा गुण म्हणीमध्ये आवश्यक आहे. म्हणी या अलिखित म्हणजे तोंडी परंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत येतात. त्या लोकांच्या तोंडी कायम राहाव्यात म्हणून त्यात यमक, प्रास, प्रायः आढळतात. उदा : अति तेथे माती, फिरे तो चरे. पुष्कळ वेळा म्हणीत अतिशयोक्ती आढळते. आपले आचारविचार, वागणूक, गुण व अवगुण, दोष यांचे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. म्हणून वाङ्मयात म्हणींचे महत्त्व फार आहे. न. चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या केली आहे, ती अशी, 'म्हा म्हणजे चिमुकले, चतुरपणाचे व चटकदार वचन.'
मराठी म्हणींचा पहिला संग्रह रेव्हरंड मॅनवॉरिंग या इंग्रज मिशनऱ्याने केला. तो १८९९ मध्ये इंग्लंडमध्ये छापला गेला. त्यानंतर 'आनंद' मासिकाचे संपादक वा. गो. आपटे यांनी १९९० मध्ये मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी हे पुस्तक प्रसिद्ध केले. मराठी भाषेतील म्हणींचा सर्वांत मोठा संग्रह 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' या नावाने कोशकार दाते-कर्वे यांनी १९४४ ते ४७ या दरम्यान प्रसिद्ध केला. हयात मोठ्या आकाराची १४०० पृष्ठे आहेत. म्हणी व वाक्संप्रदाय ह्यांचा इतका मोठा कोश कोणत्याही भारतीय भाषेत नाही. आपटे आणि दाते कर्वे यांची वरील दोन पुस्तके 'वरदा' बुक्सने प्रसिद्ध केली आहेत.
या लहानशा पुस्तकात मुख्यतः पहिली ते सातवी इयत्तेसाठी ज्या म्हणी अभ्यासल्या जातात त्या दिल्या आहेत तसेच दोन्ही प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ज्या म्हणी विचारल्या जातात त्या म्हणी दिल्या आहेत तसेच शब्दविचार या विभागात विरुद्ध अर्थाचे शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, जोडून येणारे शब्द, संधी आणि संधींचे प्रकार असे अनेक विभाग दिले आहेत.
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणूनच हे पुस्तक रचले