Mawalcha Kanha by Malati Dandekar

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price

मावळचा कान्हा

कुमारमित्र, तुमच्या कानावरून 'गोकुळचा कान्हा' हे शब्द कितीदातरी गेले असतील. गोकुळातल्या कृष्णाचे बालपणीचे ते लाडके व लोकप्रिय नाव होते. संतवाङ्मयातून, गीतगौळणीतून श्रीकृष्णाच्या बाललीला वर्णिलेल्या असतात. त्यात हे नाव पुष्कळदा येते. हा 'मावळचा कान्हा' म्हणजे मावळखोऱ्यातला हा कान्होजी जेथेही तसाच! अर्थात

श्रीकृष्णाप्रमाणे तो दैवी सामर्थ्याचा व अलौकिक कर्तृत्वाचा असा नव्हता हे खरे, पण तो शहाजी शिवाजीराजे भोसले यांच्या काळातला एक सत्प्रवृत्त शूरवीर होता. कृष्णासारखीच याच्यावरही जन्मापासूनच संकटे कोसळली, जन्मदात्याच्या सहवासाला अंतरावे लागले. पण ईश्वरकृपेने ती संकटे दूर झाली व एक कर्तबगार जीवन उदयास आले. तोच हा 'मावळचा कान्हा' कान्होजी जेधे, कारीचे देशमुख !

यांना सुदैवाने दोन सुवर्णसंधी प्राप्त झाल्या. एक शहाजीराजे भोसले यांचा सहवास अनेक वर्षे लाभला व नंतर शिवाजीमहाराजांचे सेवेतही श्रेष्ठ व प्रमुख सरदार या नात्याने युद्धात थोर कामगिरी करता आली.

शिवाजीमहाराजांच्या 'महाराष्ट्र राज्य' स्थापनेच्या काळात त्यांना समवयीन अनेक अनुयायी व सहकारी मिळाले, पण त्यांत सर्वांत वयाने ज्येष्ठ व अनुभवाने श्रेष्ठ असे बाजी पासलकर व कान्होजी जेथे हे मावळातले दोन मातब्बर शूर देशमुखही सहकारी होते व त्या वयातही त्यांनी लढाईत पराक्रमाची शर्थ केली हे विशेष!