{"product_id":"marathi-satecha-utkarshah-by-nyaymurti-mahadev-govind-ranade","title":"Marathi Satecha Utkarshah (मराठी सत्तेचा उत्कर्ष )By Nyaymurti Mahadev Govind Ranade","description":"\u003cp\u003e'न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,' यांनी महाराष्ट्रातील नानाविध सांस्कृतिक चळवळींना जन्म दिला होता. लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या थंड गोळ्यात 'ऊब' आणण्याचे कार्य न्यायमूर्तीनी केले. त्याकाळी न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासासंबंधी हे लिखाण प्रथम 'द राईज ऑफ मराठा पॉवर' या नावाने इंग्रजीत केले व ते 'लॉगमन्स' ह्या प्रकाशन संस्थेच्या विनंतीवरून केले. त्याकाळी मराठ्यांच्या इतिहासाविषयी इंग्रजीत लेखन, एलफिन्स्टन, ग्रँड डफ, टॉड अशा इंग्रजांनीच केले होते. त्यांना, बखरी व अन्य इतिहासाची साधने मिळालेली नव्हती. इंग्रजांनी 'हिंदूस्थान' हे 'जिंकलेले राज्य' असल्याने येथे येणाऱ्या अधिकारी इंग्रजांना हिंदी लोक लुच्चे, दुबळे, मिजासखोर, दगलबाज, देवभोळे आणि अज्ञानी वाटत. इंग्रज अधिकाऱ्यांच्या संपर्कात येथील स्थानिक लोक येत. ते बहुधा अशिक्षित, हांजी हांजी करणारे लुच्चे आणि मतलबी असत म्हणून इंग्रज लोकांना मराठ्यांच्या इतिहासाचे यथार्थ ज्ञान व्हावे यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यातून त्यांनी ग्रँड डफ वगैरे इंग्रज लेखकांच्या विपरीत आणि आधारहीन मतांचे खंडन केले. कारण ह्या वेळेपर्यंत कीर्तने वासुदेवशास्त्री खरे, का. न. साने., पारसनीस वगैरेंनी बखरी, आज्ञापत्रे, पत्रव्यवहार वगैरे अनेक साधने प्रसिध्द केली होती. न्यायमूर्ती रानडे यांचे हे कार्य वि. का. राजवाडे यांनी पुढे चालवले. अशा या महत्वाच्या पुस्तकाचे भाषांतर वि. गो. विजापूरकर यांनी केले व डिसेंबर 1897 मध्ये प्रसिध्द केले होते.\u003cbr\u003e    ह्या ग्रंथाच्या प्रसिध्दीनंतर अनेक महत्वाची इतिहासाची साधने उपलब्ध झाली तरीही, 'मराठी सत्तेचा उत्कर्ष' कसा झाला. याचे जे विवेचन न्यायमूर्ती रानडे यांनी केले त्याचे महत्व कमी होत नाही. न्यायमूर्ती रानडे यांना त्यांच्या इंग्रजी प्रकाशकाने शब्दमर्यादा घातल्यामुळे न्यायमूर्तींनी सूत्ररूपानेच हा ग्रंथ लिहिला त्यामुळे ह्या ग्रंथात, अनावश्यक असा एकही शब्द सापडणार नाही. न्यायमूर्ती रानडे यांचे सर्वच लिखाण, मराठी साहित्यात महत्वाचे आहे व चिरकाल टिकणारे आहे. म्हणूनच 'वरदा बुक्स' ने ह्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण हाती घेतले.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Varada Prakashan","offer_id":46040956010811,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0739\/6189\/8299\/files\/MarathiSattechaUtkarshCOVERPDF_new.jpg?v=1713771608","url":"https:\/\/varadabooks.com\/products\/marathi-satecha-utkarshah-by-nyaymurti-mahadev-govind-ranade","provider":"Varada Books","version":"1.0","type":"link"}