Marathi Bhasheche Sampraday Va Mhani (मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी) By V. G. Apte
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 140.00
Regular price
Save 0
कै. वासुदेव गोविंद आपटे. (१८७१ - १९३० ) आनंद मासिकाचे संस्थापक हे मागच्या पिढीतील थोर साहित्यिक होते. त्यांनी १९२२ साली 'शब्द रत्नाकर' हा मराठी - मराठी शब्दकोश तयार केला. वा. गो. आपटे हे 'आंतरभारती' चे पहिले प्रवर्तक होते. त्यांनी अनेक बंगाली कादंबऱ्या मराठीत आणल्या. त्यांनी कुमारांसाठी खूप लिहिले.
'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' हे पुस्तक त्यांनी १९२० साली लिहून प्रसिद्ध केले. ह्या म्हणींच्या व वाक्संप्रदायांच्या छोट्या कोशात एकंदर २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ दिले आहेत. दाते - कर्वे यांच्या कोशासारखा हा सर्वसग्राहक कोश जरी नसला तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व म्हणींचा व वाक्संप्रदायांचा अर्थ यात सापडेल. पुस्तकाच्या शेवटी वाक्संप्रदायांची व म्हणींची वर्णानुक्रमसूची दिलेली आहे. त्यामुळे 'म्हण' ताबडतोब शोधता येते स्कॉलरशिप परिक्षेच्या विद्यार्थ्यांना हा कोश फारच उपयोगी आहे. मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोश पुन्हा- पुन्हा वाचला पाहिजे.
ह्या कोशाचा दुसरा विशेष म्हणजे '२०६६' वाक्संप्रदाय व म्हणींपैकी बहुसंख्य म्हणींचे व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ 'डोळे येणे' याचा इंग्रजी पर्याय 'To have sore eyes' असा दिला आहे. मराठी वाक्संप्रदाय किंवा म्हणी यांचा इंग्रजी अनुवाद करतांना अनेकांची त्रेधा- तिरपिट उडते. 'माझे डोळे आले' हे इंग्रजीत लिहिताना 'sore eyes' लिहिण्याऐवजी अनेकजण 'My eyes have come' असे लिहितात ! म्हणींचे अर्थ व स्पष्टीकरणे अत्यंत समर्पक दिलेली आहेत उदाहरणार्थ एरंडाचे गु-हाळ याचा अर्थ ‘A Vain Effort' असा दिलेला आहे.
'मराठी' चे अभ्यासक व विद्यार्थी ह्या कोशाचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे.