{"product_id":"marathi-bhasheche-sampraday-mhani-v-g-apte","title":"Marathi Bhasheche Sampraday Va Mhani (मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी) By V. G. Apte","description":"\u003cp\u003e'डोळे येणे' याचे इंग्रजी काय? 'एरंडाचे गुऱ्हाळ' म्हणजे नेमके काय? वा. गो. आपटे यांचा \u003cstrong\u003eमराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी\u003c\/strong\u003e हा छोटा कोश अशा २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ, आणि बहुतेकांचे \u003cstrong\u003eइंग्रजी पर्याय\u003c\/strong\u003e, एकाच ठिकाणी देतो.\u003c\/p\u003e\u003cp\u003eकै. वासुदेव गोविंद आपटे (१८७१ - १९३०) आनंद मासिकाचे संस्थापक हे मागच्या पिढीतील थोर साहित्यिक होते. त्यांनी १९२२ साली 'शब्द रत्नाकर' हा मराठी - मराठी शब्दकोश तयार केला. वा. गो. आपटे हे 'आंतरभारती' चे पहिले प्रवर्तक होते. त्यांनी अनेक बंगाली कादंबऱ्या मराठीत आणल्या. त्यांनी कुमारांसाठी खूप लिहिले.\u003c\/p\u003e\u003cp\u003e'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' हे पुस्तक त्यांनी १९२० साली लिहून प्रसिद्ध केले. ह्या म्हणींच्या व वाक्संप्रदायांच्या छोट्या कोशात एकंदर २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ दिले आहेत. दाते-कर्वे यांच्या कोशासारखा हा सर्वसंग्राहक कोश जरी नसला तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व म्हणींचा व वाक्संप्रदायांचा अर्थ यात सापडेल. पुस्तकाच्या शेवटी वाक्संप्रदायांची व म्हणींची वर्णानुक्रमसूची दिलेली आहे. त्यामुळे 'म्हण' ताबडतोब शोधता येते. स्कॉलरशिप परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हा कोश फारच उपयोगी आहे. मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोश पुन्हा-पुन्हा वाचला पाहिजे.\u003c\/p\u003e\u003cp\u003eह्या कोशाचा दुसरा विशेष म्हणजे २०६६ वाक्संप्रदाय व म्हणींपैकी बहुसंख्य म्हणींचे व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ 'डोळे येणे' याचा इंग्रजी पर्याय 'To have sore eyes' असा दिला आहे. मराठी वाक्संप्रदाय किंवा म्हणी यांचा इंग्रजी अनुवाद करताना अनेकांची त्रेधा-तिरपीट उडते. 'माझे डोळे आले' हे इंग्रजीत लिहिताना 'sore eyes' लिहिण्याऐवजी अनेकजण 'My eyes have come' असे लिहितात! म्हणींचे अर्थ व स्पष्टीकरणे अत्यंत समर्पक दिलेली आहेत. उदाहरणार्थ 'एरंडाचे गुऱ्हाळ' याचा अर्थ 'A Vain Effort' असा दिला आहे.\u003c\/p\u003e\u003cp\u003e'मराठी'चे अभ्यासक व विद्यार्थी ह्या कोशाचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e\u003ch3\u003eBook Details \/ पुस्तकाची माहिती\u003c\/h3\u003e\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eलेखक \/ Author:\u003c\/strong\u003e वा. गो. आपटे (Vasudev Govind Apte, 1871–1930)\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eमूळ प्रकाशन \/ First published:\u003c\/strong\u003e 1920\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eनोंदी \/ Entries:\u003c\/strong\u003e २०६६ म्हणी व वाक्संप्रदाय, इंग्रजी पर्यायांसह\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eभाषा \/ Language:\u003c\/strong\u003e मराठी, इंग्रजी पर्यायांसह\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eबांधणी \/ Format:\u003c\/strong\u003e Paperback\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eप्रकाशक \/ Publisher:\u003c\/strong\u003e वरदा प्रकाशन, पुणे\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eIn English:\u003c\/strong\u003e A classic 1920 Marathi phrase book by V. G. Apte, founder of the children's magazine \u003cem\u003eAnand\u003c\/em\u003e. It explains 2,066 Marathi proverbs (mhani) and idioms (sampraday), most with English equivalents, with an alphabetical index for quick lookup. Useful for students, scholarship-exam candidates and translators.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eSee also:\u003c\/strong\u003e \u003ca href=\"\/products\/mhani-vakysampraday-shabdvichar-h-a-bhave-marathi\"\u003eMhani, Vakysampraday Va Shabdvichar — H. A. Bhave\u003c\/a\u003e (for Std 1–7)\u003c\/p\u003e\u003ch3\u003eमराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी — वारंवार विचारले जाणारे प्रश्न \/ FAQ\u003c\/h3\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: या पुस्तकात किती म्हणी आहेत? \/ How many proverbs?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: २०६६ म्हणी व वाक्संप्रदाय, अर्थासह आणि बहुतेकांचे इंग्रजी पर्याय.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: मराठी म्हणींचे इंग्रजी पर्याय कुठे मिळतील? \/ Marathi proverbs with English meanings?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: वा. गो. आपटे यांच्या या कोशात बहुसंख्य म्हणी व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिले आहेत. भाषांतर करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: वा. गो. आपटे कोण होते? \/ Who was V. G. Apte?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: वासुदेव गोविंद आपटे (१८७१–१९३०) हे 'आनंद' मासिकाचे संस्थापक, कोशकार आणि बालसाहित्यिक होते.\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003eQ: हे पुस्तक कुठे मिळेल? \/ Where to buy?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003eA: मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी varadabooks.com वर उपलब्ध आहे. घरपोच डिलिव्हरी मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Varada Prakashan","offer_id":46040941789499,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0739\/6189\/8299\/files\/mediamodifier_image_-_2026-07-07T130221.244.jpg?v=1783409602","url":"https:\/\/varadabooks.com\/products\/marathi-bhasheche-sampraday-mhani-v-g-apte","provider":"Varada Books","version":"1.0","type":"link"}