Marathe Sardar (मराठे सरदार) By Dattatray Balavant Parsanis
सन १९०९ सालाच्या काळात श्री. दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी 'मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार' हे एक छोटेखानी माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. पण जरी ते छोटेखानीच असले तरी; 'तो' एक शोधनिबंधवजा ऐतिहासिक संदर्भग्रंथच म्हणायला हवा. मुळात अशा विषयात एखादाजरी कागद माहिती देणारा मिळाला तरीही त्याला 'संदर्भपत्र' असे महत्त्व 'प्राप्त' होते. ह्या पुस्तकाला तर ऐतिहासिक माहितीपूर्ण अशी ६४ पाने! आहेत. हे पुस्तक आजच्या ऐतिहासिक विषयाच्या अभ्यासकांना, संशोधकांना 'बेकनब्रेड'च ठरणार आहे यात संशय नाही इतकी सूक्ष्मसंशोधित माहिती तीही तळटीपांसहित दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी या ग्रंथात उपलब्ध करून दिली आहे. अगदी आपली कारकीर्द गाजवणाऱ्या मराठे सरदारांच्या 'नावानिशी', असे ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका चाळली तरी कळते.
असा हा केवळ '६४ पानी संदर्भग्रंथ' नवीन पिढीतील नवागत संशोधक- अभ्यासक-वाचक यांना उपलब्ध करून देताना वरदा प्रकाशनाला आनंद वाटतो. त्यामुळे कित्येक वर्षांपासूनचे वरदा प्रकाशनचे 'दुर्मिळ ग्रंथांचे, ते पुन्हा उपलब्ध करून देण्याचे' धोरण पुढे चालूच राहणार आहे.