Mankarnika by Nayantara Desai

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price
Save 0

मनकर्णिका

माहेरचं नाव 'मनकर्णिका' असलेलं हे एक स्फूर्तिमत्व पेशव्यांच्या पदरचे कारभारी मदतनीस. 'मोरोपंत तांबे' ह्या व्यक्तिमत्वाच्या घरात जन्माला आलं... तेही 'काशी' येथे उत्तरप्रदेशात. ह्या मोरोपंतांचा ज्या काळात पुणे येथे मुक्काम होता तेव्हा मनकर्णिका पुण्यात शनिवार पेठेत मुठा नदीकाठच्या परिसरात मुक्कामाला होत्या.

त्यानंतर समज येण्यापूर्वीच त्यांच्या मातोश्री भागिरथी यांचं निधन झालं. मोरोपंतांबरोबरच दुसऱ्या बाजीरावांच्या वाड्यात म्हणजेच शनिवारवाड्यात त्यांची ये-जा चालू होती. बाजीरावांप्रमाणेच त्या सर्वांच्या आवडत्या होत्या. बाजीरावांचे दत्तकपुत्र नानासाहेब व रावसाहेब यांच्या बरोबरच त्या मोठ्या झाल्या. त्याच काळात स्वतः बाजीरावांनी लक्ष्मीबाई अर्थात मनू यांना लेखन वाचनाबरोबरच अश्वदौड, तलवारबाजी, बंदुकसराव, पिस्तुलनेम, जांबिया चालवणे असे कठीण युद्धोपयोगी शिक्षण दिले. त्याचबरोबर बाजीरावांच्या पदरी काम करणारे कुस्तीगीर बालंभट देवधर यांनी मैदानी कसरत व्यायाम व त्यांनीच शोधलेली मल्लखांब विद्याही लक्ष्मीबाईंना शिकवली."

प्रत्येक ऐतिहासिक महापुरुषांच्या बाबतीत जशी 'जया अंगी मोठेपण '...तया यातना कठीण' ही उक्ती लागू पडते तशी ती लक्ष्मीबाईंच्या जीवनालाही लागू पडते याची जाणीव ही कादंबरी वाचताना कळतेच. अशीच ही नयनतारा देसाई यांनी लिहिलेली कादंबरी आजच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वाचावी अशी आहे.

"