Mankarnika & Abhay Saubhagavati Savitri Bhasakarraov Bhave By Nayantara Desai
मणिकर्णिका,
जी राणी लक्ष्मीबाई या नावाने अधिक प्रसिद्ध आहे, म्हणजेच झांसीच्या राणी. ती १८२८ साली जन्मली आणि १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिचे वीरता आणि नेतृत्व कौशल्य यामुळे झांसीच्या युद्धात ती अत्यंत महत्वाची व्यक्ती बनली. तिच्या नेतृत्वात झांसीने ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात संघर्ष केला. राणी लक्ष्मीबाईच्या शौर्यामुळे ती भारतीय इतिहासातील एक आदर्श वीर नायिका मानली जाते.
अभय सौभाग्यवती 'सावित्री भास्करराव भावे'
१८५७ च्या बंडाचा वणवा मध्यप्रदेशात भडकला आणि संपूर्ण देशभर त्याची झळ पसरू लागून महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रदेशातही या वणव्याचे लोण पसरू लागले. आणि तशीच ती एकंदर योजना बांधलेली होती की ज्यामुळे एकाच तडाख्यात इंग्रज देश सोडून पळाले पाहिजेत. ह्या सीमाप्रदेशात 'नरगुंद' नावाचे संस्थान होते. आणि तिथले संस्थानिक राजे श्री भास्करराव भावे आणि ही सावित्री त्यांची अर्धांगिनी. ही सावित्री जिने जणू भास्कररावांच्या जीवनवाटेवर चालण्यासाठी त्यांनी उचललेल्या 'प्रत्येक पावलावर' स्फूर्तिबलाची मात्राच दिली. याबाबतीत या कादंबरीकेत सावित्रीबाई यांच्या तोंडी नयनताराबाईंनी फार सुंदर वाक्य घातले आहे, त्या भास्कररावांना म्हणतात, 'त्यात काय ! तुम्ही जय्यत तयारीनिशी इंग्रजांवर तुटून पडा.. तुमच्यासारख्या पराक्रमी वीराला भय कशाचं ?'. ह्या 'सावित्री भास्करराव भावे' यांचे हे कादंबरीकारुप चरित्र वाचून आजच्या प्रत्येक विद्यार्थीनीने आपल्या पतीच्या जीवनात मनाची