मनाचे सामर्थ्य
हे पुस्तक मानवी मनातील अद्भुत शक्ती उलगडून दाखवते. ओरिसन स्वेट मार्डन यांच्यापासून प्रेरणा घेत, लेखक ह. अ. भावे यांनी मनुष्याच्या यशामागील खरी ताकद,मन अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत मांडली आहे. मन आणि शरीर यांचा अतूट संबंध आहे. मनात निराशा असेल तर शरीर थकते, आणि मन प्रसन्न असेल तर अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही विजय मिळवता येतो. “उद्योगिनम् पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः” हे फक्त सुभाषित न राहता प्रत्यक्ष जीवनात कसे उतरवायचे, हे हे पुस्तक शिकवते.
हे पुस्तक सांगते की, मन मजबूत असेल तर संकटे संधी बनतात, सतत कार्यरत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचारांनी जीवनात उत्साह निर्माण होतो, मनाशी संवाद साधल्याने अंतर्बल वाढते. आज जपानसारख्या राष्ट्राने ज्याला राष्ट्रगुरू मानले, त्या ओरिसन स्वेट मार्डन यांच्या विचारांचे सार भारतीय वाचकांसाठी या पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे. मनाचे सामर्थ्य हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि जीवनात यश, शांती व आत्मविश्वास शोधणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे.