Maharani Bayajabaisaheb Shinde Yanche Charitra महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र By Dattatray Balwant Parasnis

Maharani Bayajabaisaheb Shinde Yanche Charitra (महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र) By Dattatray Balwant Parasnis

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नाव जुन्या लोकांच्या मुखातून मात्र आजपर्यंत ऐकू येत होते; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असे एकही चरित्र प्रसिद्ध नव्हते. ते प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक इंग्रजी व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् हा अगदी पहिलाच प्रयत्न असल्यामुळे हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपूल माहिती मिळण्याचा संभव नाही. म्हणून जेवढी माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या चरित्रामध्ये दाखल करून हे ऐतिहासिक चरित्र महाराष्ट्र वाचकांस सादर केले आहे..

बायजाबाई शिंदे ह्या राजकारणी व कर्तृत्वशाली स्त्रियांपैकी एक सुप्रसिद्ध स्त्री असून त्यांचे चरित्र वाचनीय व विचारयोग्य असे आहे.