Maharana Pratap (महाराणा प्रताप) By Parshuram Katadare
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Save 0
महाराणा प्रताप यांची विजयगाथा.आपल्या मराठी भाषेत लहान मुलांना उपयोगी असे वाच्य फारच अल्प प्रमाणावर आहे. त्याची आज बरीच उणीव आहे. बडोदे राज्यात म. रा. रा. विद्याधिकारी साहेब यांनी जी 'बालज्ञानमाला' सुरू केली आहे. त्यायोगाने बरीचशी उणीव भरून निघेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
या बालज्ञानमालेचा मुख्य उद्देश लहान मुलांना हसत खेळत विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करून देणारे वाच्य निर्माण करणे हा आहे. त्याला अनुसरून रा. रा. रमणलाल वसंतराम देसाई, एम. ए. यांनी 'महाराणा प्रताप' या नावाचे एक पुस्तक गुजराथी भाषेत लिहिले आहे. त्याचे मराठीत रूपांतर करण्याचे मजकडे सोपविण्यात आल्यावरून हा माझा अल्प प्रयत्न माझ्या बाळमित्रांपुढे सादर करीत आहे.
विषयाची मांडणी मूळ पुस्तकात ठरून गेल्यामुळे त्या मांडणीला अनुसरूनच भाषांतर करणे भाग पडले. मूळ पुस्तकाचे शब्दश: भाषांतर न करिता योग्य ठिकाणी फेरफार करून लहान मुलांना सरळ, सुबोध व वाचनीय होईल असे करण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्याचे यश बालमित्रांच्या हे पुस्तक वाचनाच्या गोडीवर अवलंबून आहे.