Mahabharat Kathasar by Vharatacharya C V Vaidya

Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price
Save 0
महाभारत कथासार

एक लक्ष लोकांचे महाभारत हा जगातील कोणत्याही भाषेतील महाकाव्यांना मागे सारणारा एक चमत्कार आहे. महाभारत आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. त्यातील व्यक्ती आमच्या जीवनाशी एकरूप झालेल्या आहेतधर्म, अर्जुन, भीम, भीष्म, कर्ण वगैरेंच्या चरित्रांनी सर्व भारतीय जीवन आज हजारो वर्षे भारुन टाकले आहे. ती पात्रे महाकाव्यातील न राहता आमच्या लोक-जीवनाशी एकरूप झाली आहेत. केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही; पण तसेच या जगात केवळ दोषपूर्ण असेही कोणी नाही, ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगत आहे.

मानवी जीवन हे पांढऱ्या व काळ्या तंतूचा पट आहे ही गोष्ट महाभारत सांगत आहे. अलिप्त राहून भगवान व्यास जगातील विराट संसाराचे छायाप्रकाशमय चित्र दाखवीत आहेत. व्यासांनी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की "लोकांच्या हृदयातील मोहावरण घालवण्यासाठी मी हा इतिहास-प्रदीप पेटवीत आहे." मोहाचा अंधारे घालवणारा दीप पेटवण्याचे काम महाभारत-कथासार करणार आहे.