Krodhavar Vijay Milava(क्रोधावर विजय मिळावा ) By H A Bhave
जेथे प्रेमाचा झरा वाहात असतो तेथे क्रोधाला जागा नसते. अन्याय घडल्यावर क्रोध येतो हे खरे. पण काही लोकांना काही कारण नसताना क्रोध येतो. असा क्रोध आवरलाच पाहिजे. क्रोध हा माणसाला जाळून टाकणारा आहे. क्रोधाने तुम्हाला जाळण्यापूर्वी तुम्ही क्रोधाला जाळले पाहिजे. कारण नसताना क्रोध केल्यामुळे कोणाचाच फायदा होत नाही. क्रोध काबूत आणण्यासाठी दोन उपाय आहेत. एक म्हणजे मनाचा समजूतदारपणा हवा व दुसरे म्हणजे क्षमाशील वृत्ती हवी. राग का येतो? कारण माणसाचा अभिमान दुखावतो पण येशु ख्रिस्ताने तर त्याचे प्राण घेणाऱ्या लोकांसाठीही ईश्वराकडे क्षमा मागितली होती. क्रोधावर क्षमा हाच रामबाण उपाय आहे. साधू संत आणि सर्व थोर माणसे क्षमाशीलच असतात. कोणताही धर्म तुम्हाला अपकार करणाऱ्यावर उपकार करायला शिकवतो. क्रोध आला असता थोर लोक कसे वागले याची जरा आठवण करा. ज्याला यशस्वी व्हायचे आहे त्याने क्रोधावर विजय मिळवलाच पाहिजे. या विजयाने मन शांत रहाते आणि यश तुमच्या पायाशी चालत येते.