Kim Jong Un Ani Uttar Koriya( किम जोंग उन आणि उत्तर कोरिया )By Nikhil Kaskhedikar
अणुबॉम्बचे बटन माझ्या टेबलवर आहे हे ठासून सांगणारा आणि पाश्चिमात्य जगाला शत्रू मानणारा उत्तर कोरियाचा सुप्रीम लीडर म्हणजे किम जोंग ऊन... आणि तितकाच न कळणारा त्याचा देश... म्हणजे उत्तर कोरिया ! या दोन्ही गोष्टिंभोवती एक नकारात्मक वलय आहे. ते तसं का आहे! त्याला कोणती कारणं जबाबदार आहेत. तसंच किम घराण्याची सत्ता मागची आठ दशकं कशी टिकून आहे या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकाने अभ्यासपूर्ण पद्धतीने केला आहे. मराठी वाचकांना आवडेल अश्याच पद्धतीने लेखक आणि अभ्यासक निखिल कासखेडीकर यांनी 'किम जोंग ऊन आणि उत्तर कोरिया' ह्या पुस्तकाच्या माध्यमातून हा विषय समोर मांडला आहे. किम जोंग ऊन याने उत्तर कोरियावर पोलादी पकड कायम ठेवली आहे. हे त्याला कसं शक्य झालं हे वाचणं सुद्धा रंजक आहे. तसंच कोरियन द्वीपकल्प आणि त्याचा इतिहास, जपानने केलेलं आक्रमण ते थेट शीतयुद्ध आणि आधुनिक उत्तर कोरिया याबद्दल वाचणं सामान्य वाचकाला आवडेल याची खात्री आहे आणि म्हणूनच 'किम जोंग ऊन आणि उत्तर कोरिया' हे पुस्तक विशेष आहे. मराठी वाचक, अभ्यासक, विद्यार्थी, पत्रकार, लेखक अश्या सगळ्या स्तरातील लोकाना हे पुस्तक उपयोगी वाटेल आणि ते किम जोंग ऊन या व्यक्तिमत्वाचा आणि उत्तर कोरिया या त्याच्या देशाचा अभ्यास कुतूहल म्हणून करतील अशी खात्री आहे.