Khardyachya Swarichi Ani Sawai Madhavrao Narayanrao Peshve Yanchi Bakhar

Khardyachya Swarichi Ani Sawai Madhavrao Narayanrao Peshve Yanchi Bakhar(खर्ड्याच्या स्वारीची आणि सवाई माधवराव नारायणराव पेशवे यांची बखर) By Kashinath Narayan Sane

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price

शि. म. परांजपे यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या लढायांचा इतिहास' ह्या पुस्तकात' 'खर्ज्याच्या स्वारी' चे वर्णन नाही, त्यामुळे ह्या बखरीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे, तसेच हैदराबादच्या निजामअल्लीने ह्या स्वारीचा बेत आखला त्यावेळी, पेशवाईतले दोन खन्दे सरदार हरिपंत फडके, आणि महादजी शिंदे हे नुकतेच मृत्यू पावले होते. अशा परिस्थितीत पेशवाईतले एकमेव मुत्सद्दी म्हणजे 'नाना फडनविस' यांनी दुसऱ्या बाजीरावाला नजरकैदेत ठेवून रितीनुसार 'दुसरे माधवराव भट ह्या' नारायणराव पेशवे यांच्या चिरंजिवास 'पेशवेतख्तावर' विराजमान केले आणि त्यानंतर जनतेने... त्यांना 'सवाई माधवराव पेशवे' अशी लोकपदवी दिली.
     तख्तावर बसेपर्यंतचे सर्व फक्त दरबारी शिक्षण एकट्या 'नाना फडनविस' ह्यांनीच त्यांना दिले. रोजच्या दरबारात सवाई माधवराव यांच्या शेजारी बसून नाना फडनविस यांनीच जवळ-जवळ बावीस वर्षे पेशवाई सांभाळली. ह्याच काळात 'खड्र्ज्याची स्वारी' पेशवाईच्या समोर उभी ठाकली तरीही 'नाना फडनविस' आणि 'सवाई माधवराव नारायणराव पेशवे' ह्या जोडीने ती स्वारी कशी उलथवली ह्याचे मोठे सुंदर वर्णन ह्या पुस्तकात वाचायला मिळेल यातून 'सत्तेबाबतची निष्ठा आणि कर्तव्य याबाबतचे तत्कालीन महत्व' लक्षात येते कारण, दोघांनाही प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव आणि शस्त्रज्ञान नव्हते तरीही ऐन युद्धप्रसंगी दोघेही रणांगणावर डेरे-हजर असंत, असंही ह्या छोटेखानी बखरीतून लक्षांत येते.