Karyavedhe Vha By H A Bhave

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0

कार्यवेडे होणे म्हणजे आळसावर मात करणे असते. आळस का सोडला पाहिजे व कार्यवेडे का व्हायला पाहिजे ? याचे विवेचन दासबोधामध्ये फार सुंदर केले आहे साक्षेप करिता कष्टती । परंतु पुढे सुरवाडती । खाती जेविती सुखी होती । यत्नेकरूनी ॥11॥ आळस उदास नागवणा। आळस प्रेत्र बुडबणा । आळसे करंटपणाच्या खुणा । प्रगट होती ॥12॥ म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा अरत्री परत्री जीवा । समाधान ॥ 13 ॥ प्रेत्र करावा तो कोण। हे चि ऐका निरूपण । सावध करून अंत:करण। निमिष येक ||14|| प्रातःकाळी उठावे । काही पाठांतर करावे। यथानुशक्ती आठवावे । सर्वोत्तमास ॥15॥ कार्यवेडे स्विकारण्याच्या कामात मुख्य अडथळा किंवा शत्रू आळसच असतो. समर्थ रामदासांनी होण्याचा मुख्य अडथळा आळसच सांगितला आहे.निवृत्त माणसे जर काम सोडून स्वस्थ बसली तर ती लवकर मरतात निवृत्ती म्हणजे “समाजसेवेची एक संधी आहे' असे समजून सतत कार्यरत राहिले पाहिजे. रोज काहीतरी उपयुक्त कार्य केल्याशिवाय मी जेवणार नाही. असा साधा नियम केला तरी तुम्ही कार्यवेडे होऊ शकाल. जुगार, लॉटरी यामागे लागणारे लोक आळशीच असतात. आळशी मनोवृत्ती हा फार मोठा रोग आहे व सतत कार्यरत राहणे हेच त्यावरील औषध आहे. आळसाविरूद्ध लढाई करण्यासाठी कार्यवेडे व्हायला हवे एका संस्कृत सुभाषितात म्हटले की आळस हा मनुष्याच्या शरीरात राहणारा मोठा शत्रू आहे. आणि उद्योगासारखा दुसरा आप्त नाही कारण उद्योग करणाऱ्यास काहीतरी फळ मिळाल्याखेरीज राहात नाही. जगाच्या इतिहासाकडेपाहिल्यास सर्व महान माणसे कार्यवेडे असल्याचेच आढळतात. कार्यवेडा माणूस हातात घेतलेल्या कामावर मनापासून प्रेम करतो भरपूर काम केल्यानंतर जी विश्रांती आणि करमणूक मिळते ती फारच गोड भासते. कार्यवेड आणि मेहनत या दोन गोष्टी लोखंडाचे सोने बनविणाऱ्या परिसासारख्या आहेत.