Karmyogini & Pauranik Arya Stri Ratane By Dr P S S Jagatap & Damodar Laxman Lele
प्रस्तुत ऐतिहासिक पुस्तकात राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जीवन चरित्राचा सर्वंकष आढावा घेतला असून त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगाचे हृदय द्रावक वास्तववादी चित्रण केलेले आहे. त्यामुळे प्रेरणा घेऊन आजच्या आधुनिक काळातील महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगतीची गरुड झेप घेतली आहे. तसेच त्यांच्या निःस्पृह कर्तुत्वाचा आदर्श समोर ठेवून आजच्या स्त्रिया धाडसी, निर्भय, कर्तुत्ववान व सुसंस्कृत अशा निर्माण झालेल्या आहेत.
या ऐतिहासिक महिलांचे त्यागमय जीवन सर्वांनाच प्रेरणा देत राहील. पौराणिकआर्य स्त्रीरत्नेयांत दिलेली बहुतेक चरित्रे पौराणिक आहेत. आमच्यादेशात आजपर्यंत जे अनेक साधुसंत व सत्वस्थ कवी होऊन गेले अशा महाजनांच्या ग्रंथाधारेचही सर्व चरित्रे लिहिलेली आहेत. या पुस्तकांत सीमंतिनी, सावित्री, महानंदा, द्रौपदी,अनुसूया, दत्तकांता, स्वाहा, सीता, पद्मावती, सुलोचना, संत सखू, देवहूती अशी 'बारा'चरित्रे दिली आहेत.