Karmnukitil Karmanuk (करमणुकीतील करमणूक) By Hari Narayan Apate

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
महाराष्ट्राचे जुन्या पिढीतले सिध्दहस्त आणि दिग्गज असे कादंबरीकार ह.ना. तथा हरि नारायण आपटे (सन १८६४ ते१९१९)यांनी पूर्वी इतर कादंबरी लेखन सांभाळून ' करमणूक ' हे एकपाक्षिक ( दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पत्र ) सुरु केलं होतं त्यात बहुजन सुधारणा हा त्यांचा हेतू होता. हे पाक्षिक त्यांनी त्यांच्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातली वीस एकवीस वर्षे चालवले.    सदरहू पाक्षिकात पान-पूरके ( लेखानंतरच्या रिकाम्या जागा भरण्याचा ज्यादा मजकूर ) म्हणून स्वतःच लिहून अनेक गमतीदार विनोदी किस्से अन् चुटके छापले होते. ते एकत्र करून त्यांनी एक पूर्णपणे सोज्वळ आणि मध्यमवर्गीय भाषेतले विनोदाचे पुस्तक प्रकाशात आणले ते पुस्तक म्हणजे ' करमणुकीतील करमणूक ' हे पुस्तक होय.
त्यांच्या जीवनात अनेकदा कौटुंबिक नैतिक असे दुःखद प्रसंग घडले (जे ह्या पुस्तकातल्या त्यांच्या संक्षिप्त चरित्र लेखात सांगितले आहेत)...त्यामुळे त्यांच्या हृदयावर लागोपाठ दुःखाची आभाळे कोसळली तरीही ' दुःखाने गांजलेल्या व्यक्ती अखेर स्वभावाने हळूहळू ' विनोदी ' स्वभावाची होऊन जातात ' ह्या प्रमाणे ते विनोद लिहू लागले. ही नक्कीच वाखाणण्यासारखी घटना मानली पाहिजे. 
--