Kalidas Va Raja Bhoj by H A Bhave
    Regular price
    
        Rs. 100.00
      
    Sale price
    
        Rs. 100.00
      
      Regular price
      
            Save 0
          
                कालिदास व राजा भोज यांच्या कथा
राजा भोज हा इसवी सन 999 म्हणजे हजार वर्षांपूर्वी माळव्यातील धारानगरी येथे राजा होता. तो लोकप्रिय व आदर्श राजा होता. कालिदास त्याच्यापूर्वी 500 वर्षे होऊन गेला. परंतु कालिदास व भोज राजा यांच्याविषयी जनमानसात आख्यायिका एकत्रच गुंफल्या गेलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाराणासीच्या बल्लाळदेव यांनी 16 व्या शतकात रचलेला भोजप्रबंध हा प्रसिद्ध ग्रंथ होय. या सर्व कथा भोजप्रबंधात येण्यापूर्वीच जनमानसात खोलवर रूजल्या होत्या. या सर्व कथांतून भारतीय संस्कृतीचा गाभाच उकलून दाखवला आहे. भोजप्रबंध या ग्रंथात जागोजागी विचार व भावना यांनी भरलेली 116 सुभाषिते आलेली आहेत. संस्कृत कवितेतील कल्पनाविलास, नादमाधुर्य व शाश्वत सिद्धांत असे बहुमोल विचारधन या सुभाषितात भरलेले आहे. या श्लोकात चमत्कृती आहेत व प्रहेलिका पण आहेत. येथे भोजराजा व कालिदास समकालीन होते की नव्हते हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवूनच या कथांकडे पाहिले आहे. या पुस्तकात एकंदर 58 कथा आहेत. प्रत्येक कथेत कालिदास किंवा राजा भोज यांच्या चारित्र्याचे किंवा कुशलतेचे वर्णन आहे. या सर्व कथा छोट्या आहेत. परंतु त्यातूनच तत्कालीन नागर समाजाचे दर्शन घडते. काही संस्कृत सुभाषितांचे मराठी रूपांतरही केलेले आढळेल. पण तेही अतिशय रम्य आहे. उदा. 29 व्या कथेतील विहिरीवरचा प्रकार या कथेतील एक मराठी काव्याची ओळ देतो. त्यात किती गंमत आहे ते पहा. अलिकुल वहनाने वहन आणित होती. या ओळीचा अर्थ असा.अलि म्हणजे भ्रमर. भ्रमराचे वहन कमळ आणि कमळाचे वहन म्हणजे पाणी. ते पाणी ती आणीत होती. अशा शब्दांच्या चमत्कृती ठायी ठायी दिसून येतील आणि त्या काव्यानंदाने तुमचे मन संतुष्ट होईल. भोजराजाने तेलंगणाचा राजा गांगेयदेव याचा पराभव केला होता. त्यावरूनच कोठे राजा भोज व कोठे गंगा तेली अशी म्हण तयार झाली. अशा म्हणीही राजा भोजवर जनमानसात रूढ झाल्या आहेत.