Jagat Kase Vagave Shambhar Niyam जगात कसे वागावे शंभर नियम By H A Bhave
Jagat Kase Vagave Shambhar Niyam जगात कसे वागावे शंभर नियम By H A Bhave
Jagat Kase Vagave Shambhar Niyam जगात कसे वागावे शंभर नियम By H A Bhave

Jagat Kase Vagave Shambhar Niyam (जगात कसे वागावे शंभर नियम) By H A Bhave

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0
जगात वागावे कसे? याच नावाचे एक पुस्तक 55-60 वर्षापूर्वी सांगलीचे कारखानदार धनी वेलणकर यांनी लिहिले होते. पण आता समाज खूपच बदलला आहे. 21 व्या शतकातील तरुणांनी जगात कसे वागावे ? हे वेगळे सांगण्याची वेळ आली आहे कारण सध्या तरुणाजवळ आणि सुतारासारख्या कामगाराजवळही मोबाईल फोन असतो. 50 वर्षापूर्वी अन्नधान्याची टंचाई होती. मेजवान्यावर नियंत्रणे होती अमेरिकन पांढरा गहू मिलो खायला लागत होता. पण आता ही सर्व परिस्थिती हरितक्रांतीमुळे बदलली आहे. आता भारत धान्य निर्यात करतो. लग्नसमारंभात बुफे डिनर पद्धत आली आहे. याच बदलत्या समाजातील वर्तनाचे नियम बदलणारच.

म्हणूनच ह्या पुस्तकात लोकव्यवहाराचे शंभर नियम दिले आहेत. अर्थात समाज कितीही बदलला तरी समाजातील वर्तनाची मुलभूत तत्त्वे तशीच रहाणार. संयमाचे सामर्थ्य, शिस्त, नियमितपणा अशा सद्गुणांचे महत्त्व कोणत्याही काळी कमी होणार नाही. समाजातील वर्तनाची मुलभूत तत्त्वे तीच रहाणार आहेत. नवीन कालानुरूप जुन्या तत्त्वांना उजाळा दिला आहे. याच शंभर नियमांपैकी प्रत्येक नियम अतिमहत्त्वाचा आहे.

कोणत्याही कालखंडात जगातील सर्वच समाजावर धर्म- कल्पनेचा प्रभाव असतोच. पण धार्मिक रूढी व समजुती यातून अंधश्रद्धा निर्माण होते. व त्या अंधश्रद्धेतून समाजाचा खूपच तोटा होत असतो. काही लोक ईश्वरभक्ती म्हणजे जपजाप्य समजतात. पण कार्य हीच ईश्वरसेवा हे साधे तत्त्व लक्षात ठेवल्यास माणसाच्या वैयक्तिक जीवनात व सामाजिक जीवनात क्रांतीकारी बदल होईल. अजूनही हिंदू समाजातील माणसांच्या पापपुण्याच्या विचित्र कल्पना आहेत. अजूनही हिंदू कुटुंब प्रमुखाची घरातील वागणूक हुकुमशाहीचीच असते त्याच्यासाठी येथे प्रचंच विज्ञान सांगितले आहे.

हे पुस्तक एकदा वाचून बाजुला ठेवू नका. हा आधुनिक आचारधर्म आहे. एखाद्या क्रमिक पुस्तकातील अभ्यासक्रमाप्रमाणे तरुणांनी ह्याचा अभ्यास केला पाहिजे. हे पुस्तक अनेकदा वाचा व यातील तत्त्वे अमलात आणा म्हणजे तुम्हाला आयुष्यात उज्वल यश मिळू शकेल.