Jagala Prem Arpave(जगाला प्रेम अर्पावे ) By H A Bhave

Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price
Save 0

ओरिसन स्वेट मार्डेन (१८२४) याने अमेरिकेतील आणि जगभरच्याच हजारो नव्हे, लाखो तरुणात 'यत्न तो देव जाणावा' ही पुरुषार्थ - प्रेरणा निर्माण केली. आज जगात जपान, अमेरिकेपेक्षाही पुढे आहे. जपानने या ओरिसन स्वेट मार्डेनला जणू राष्ट्रगुरुच मानले होते. मार्डेनच्या सर्व पुस्तकांचे अनुवाद जपानमध्ये प्रचंड प्रमाणात खपले आहेत. आपण भारतीय लोक 'उद्योगिनम् पुरुषसिंहम् उपैति लक्ष्मी : ।' हे फक्त सुभाषितात पाठ करतो. मार्डेनने त्याचा निराशा झटकून टाकायला शिकवले.वस्तुपाठ तरुणांना दिला. ‘Love's way' या पुस्तकाचा हा भावानुवाद आहे. २४० पृष्ठांच्या पुस्तकात २५ प्रकरणे असून 'प्रेमभावना या जगात काय काय करू शकते.' हे येथे सांगितले आहे. मानवी आयुष्यात प्रेमभावना सर्वत्र भरलेली आहे. प्रेमभावनेच्या विविध रूपांचे दर्शन या पुस्तकातून केलेले आहे. परमेश्वराने मानवाला प्रेमपत्र लिहिले असून, ते निसर्गातून आपल्याला वाचता येते. निसर्गातून प्रेमभावनेचा प्रभाव मानवाला जाणवतो व मधमाशीसुद्धा मानवाला परोपकार शिकवते. 'प्रेमभावनेच्या मदतीने अवगुणांची कुंपणे कशी तोडायची व आपले जीवन सुंदर कसे करायचे' हे या पुस्तकात सांगितले आहे. प्रेमभावना म्हणजे माणसाला मिळालेले ईश्वरी वरदानच आहे. या वरदानाचा पुरेपूर उपयोग मानवाने केला पाहिजे. तुमची दैनिक कर्तव्ये कोणती ? अनोळखी माणसांशी कसे वागावे ? कुटुंबात सुखसमाधान पसरण्यासाठी काय केले पाहिजे ? देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी कसे वागावे? अशा अनेक व्यावहारिक सुचना या पुस्तकात केलेल्या आढळतील असे हे सर्वांगसुंदर पुस्तक तुम्ही पुन: पुन्हा वाचा व आत्मसात करा. हे पुस्तक तुमच्या जीवनात अपूर्व परिवर्तन घडवेल असे खात्रीने सांगता येईल.