Indrabhuvan Guha by Govind Narayan Datarshastri

Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price


इंद्रभुवनगुहा

'इंद्रभुवनगुहा' ही कादंबरी रहस्यमय व ऐतिहासिक असून ती हजार वर्षापूर्वीच्या वातापी साम्राज्यात घडून येते. हे वातापी साम्राज्य दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटक दरम्यान होते. हे वातापी नगर सध्याच्या कर्नाटकातील बदामीच्या परिसरात होते. अजूनही बदामी येथेजुन्या राजधानीचे अवशेष सापडतात. बदामी हा तालुका सध्याच्या विजापूर जिल्ह्यातील कर्नाटकात आहे. या बदामी शहराजवळच एक डोंगर असून त्या डोंगरात रत्नांनी आणि संपत्तीने भरलेली एक मोठी गुहा होती. व त्या गुहेलाच 'इंद्रभुवन गुहा' असे नाव होते. बराच काळ लोटल्यामुळे अनेकांच्या स्मरणातून नष्ट झालेल्या इंद्रभुवन गुहेचा व त्यातील संपत्तीचा शोध घेण्याचा या कादंबरीत प्रयत्न दाखविला आहे. शेवटी 'इंद्रभुवनगुहा' सापडतेच आणि शेवटी सगळेच गोड होते पण त्यापूर्वी कारस्थाने, लढाया, चित्तथरारक प्रवास यांच्या रोमहर्षक हकिकतीत वाचकाचे मन या कादंबरीत अगदी गुंतुन पडते.