Hindu Darmacha Pravas By Dr Sharachhandra Govind Ingale
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 750.00
Regular price
Save 0
हिंदू धर्मातील विविध पंथ, परंपरा, साधना व आचार-विचार, समज-गैरसमज यांचे मूळ ऋग्वेदात कसे सापडते याचे विवरण करून हिंदू धर्माचे एकूणच स्वरूप व्यक्त करणारे प्रस्तुत पुस्तक आहे. त्यासाठी प्रस्तुत लेखकाच्या ऋग्वेदाचे वैज्ञानिक आकलन या विषयावरील पुस्तकांचा विशेष उपयोग केला आहे कारण अगम्य अशा वेदांचे पूर्णपणे आकलन अजूनही उपलब्ध नाही. प्राचीन ग्रंथांचेही नीट आकलन व्हावे यासाठीही मूळ जो ऋग्वेद आहे त्याकडे वळणे कसे आवश्यक आहे हे दाखवून अनेक उदाहरणांसह ते सिद्ध केले आहे. वेदांची सहा प्रमुख आकलने, जी षट्शास्त्रे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचा तुलनात्मकरीत्या अभ्यास करीत व इतरही वेदप्रामाण्य न मानणारी बौद्ध, जैन, चार्वाक इत्यादी दर्शनांचाही आढावा घेत उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत, अष्टांगयोगदर्शन, भगवद्गीता व श्री ज्ञानेश्वरांचा अजातवाद यांचा परामर्ष प्रस्तुत पुस्तकात आढळतो. तामस श्रद्धेचे अंधश्रद्धेमध्ये केव्हा रूपांतर होईल याचा नेम नसतो. यामुळे अंधश्रद्धेला आळा बसावा, धार्मिक वृत्ती असणाऱ्यांची रूची वाढावी व अश्रद्धांना आकृष्ट करावे, या हेतूने हे पुस्तक प्रेरित झाले आहे.