Hindi Sanskruti Ani Ahinsa (हिंदी संस्कृती आणि अहिंसा) By Dhrmand Kosambi
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Regular price
Save 0
जगात प्रत्येक संस्कृती अथवा धर्म, यात जी आधारभूत तत्वे दिसतात. त्यांचा अनेक विद्वान सखोल अभ्यास करून गेले. त्यापैकी एक म्हणजे धर्मानंद कोसंबी होय.त्यांचा 'हिंदी संस्कृती आणि अहिंसा' हा ग्रंथ म्हणजे हिंदी संस्कृतीतील मतभेदांचे सखोल असे खंडन-मंडन होय त्यांनी थोडक्यात हिंदी संस्कृती मधील नकारात्मकता शोधून त्यावर केलेले भेदभाष्य म्हणजे हा ग्रंथ होय. त्यांचे चरित्र वाचले असता त्यांनी कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत हा आटापिटा केला ते कळेल. तेही सर्वांनी वाचावे असे म्हणावे असे वाटते...आता नकारात्मकता दाखविली आहे. म्हणजे ती धर्मानंद कौसंबी यांच्यासारख्या विद्वान गृहस्थांनी दाखवली आहे, त्यांनी हा ग्रंथ तयार करण्यापूर्वी अनेक देशी, परदेशी धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात नेपाळ वगैरे सारख्या, दुर्गम ठिकाणी जाऊन राहून आणि पुढे योग्य संधी प्राप्तहोताच परदेशात राहून हा. सारा संशोधनात्मक अभ्यास केला आहे.'साधे वृत्तपत्र बाहेर जाऊन विकत घ्यायला आपण कंटाळा करतो किंवा कष्टी चेहेऱ्याने बाहेर जाऊन घेतो, किंवा ते घरपोच लावतो आणि तरीही ते वाचतोच असेही नाही.' म्हणजे हे काम साधे-सोपे नाही. म्हणून, हा ग्रंथ प्रत्यक्ष वाचल्यावर त्यातले विचार पटतात, अन् त्यासाठीच चिकित्सक दृष्टीच्या वाचकांनी तो वाचला पाहिजे.