Gavakadchya Vyakti Ani Valli(गावाकडच्या व्यक्ती आणि वल्ली) By Dr P S Jagatap

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0

गावाकडच्या कर्तृत्ववान व्यक्तींकडून समाजातील आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात विकासाचे कार्य झालेले आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू येथे उलगडून दाखविलेले असून त्या माध्यमातून त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र समाजाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यक्तींचा समाजाने यथोचितपणे केलेला सन्मान व त्यांच्याविषयी व्यक्त केलेली आदराची भावना येथे स्पष्ट केलेली आहे. यातून त्यांना त्यांच्या यापुढच्या कार्यासाठी सदैव प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजापुढे आणलेले असून यामुळे नवीन पिढीला निश्चितपणे विकासाच्या वाटा शोधण्यास मदत होईल. समाजातील दुसरा घटक, तो म्हणजे 'वल्ली' अशी वल्ली असलेली माणसं मिष्किलपणे त्यांचं जीवन जगत असतात. त्यांच्याकडून समाजाला कधी फायदा तर कधी उपद्रव होतो. त्यांच्या उपद्रवापासून सावध राहून भोळ्याभाबड्या वृत्तीने न फसण्यासाठी सल्ला देण्यात आलेला आहे.  अशा माणसांच्या वर्तनाचे सूक्ष्मरीतीने निरीक्षण करून स्वतः ला सावरले तर निश्चितच अशा वल्ली असलेल्याकडून सावधपणे दूर राहण्यात आपण यशस्वी होऊ अशी खात्री आहे.