English Bhashecha Shriganesha (इंग्रजी भाषेचा श्रीगणेशा) by M. G. Kale / Anuradha Kale

English Bhashecha Shriganesha (इंग्रजी भाषेचा श्रीगणेशा) By M. G. Kale / Anuradha Kale

Regular price Rs. 60.00
Sale price Rs. 60.00 Regular price
Save 0
     कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा म्हटला की ज्या भाषेत त्या विषयाची माहिती लिहिलेली त्या भाषेची जाण त्या संबंधित अभ्यासकाला हवीच व हा दृष्टिकोन समोर ठेवून 'इंग्रजी भाषेचा श्रीगणेशा' या पुस्तकाची मांडणी केली आहे. ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना इंग्रजी भाषेची जाण चांगली व्हावी हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे व भाषेची जाण हवी असेल तर त्या भाषेचे व्याकरण समजून घेणे आवश्यकच आहे.
   भाषेत वापरले जाणारे काळ, वाक्य पृथक्करणाचा परिचय, होकारात्मक, नकारात्मक वाक्ये, कर्तरी व कर्मणी प्रयोग करण्याच्या पद्धती, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवेदन करण्याच्या पद्धती वगैरे या गोष्टींचा परिचय शक्यतो मराठी माणसाला पट्कन् कळेल अशा पद्धतीने या पुस्तकातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
  पायाभरणी व्यवस्थित झाली तर इमारत मजबूत राहू शकते. इंग्रजी भाषेची जाण अवगत झाली तर पुढील उच्च शिक्षणाचे प्रयत्न यशस्वी होण्यास खूप मदत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी (English Medium) इंग्रजी माध्यम असणाऱ्या शाळेतच विद्यार्थ्यांना घालायला हवे असा गैरसमज झाला आहे, असे पदोपदी जाणवते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे मान्यवर नेत्यांनी इंग्रजी भाषेवर 'जे प्रभुत्व मिळविले' ते कसे याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘Well begun is half done.' व्याकरण चांगले कळले की भाषेवर प्रभुत्व मिळविणे काहीही कठीण नाही. भाषेची जाण झाली की चांगले वाचन हवे. शब्दभांडार वाढवा, चांगले इंग्रजी ऐका, लिहा व भीती न बाळगता बोलायला लागा. 'Practice makes you perfect.' हे तत्त्व विसरू नका. शेवटी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते व ती अशी की, ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविणे सोपे जाते व असे विद्यार्थी निश्चितच इतरांपेक्षा घवघवीत यश मिळविण्याची शक्यता जास्त असते. मुद्दा एकच की इंग्रजी भाषा शिकणाऱ्या व्यक्तींनी त्या भाषेची पायाभरणी आपापल्या मातृभाषेतून करणे सोयीचे व फलप्रद ठरेल.