Chitturcha Vedha by Nageshrao Vinayak Bapat

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0
चितूरगडचा वेढा

'चितूरगड' ह्या किल्ल्यासारखे धीरगंभीर रूपाचे विस्तिर्ण किल्ले बहुतेक भारताच्या प्रत्येक राज्यात आहेत. तेथे जशी दृष्य निसर्गसौंदर्याची देणगी लाभलेली आहे तशी अदृष्य ऐतिहासिक अशा घटनाक्रमाचीही देणगी लाभलेली आहे. तेथील किल्ल्यांचे मार्गदर्शन करणारी मंडळी पर्यटकांस आपापल्या परीने माहिती देतातच. तेव्हा ती दृष्ये पर्यटकांच्या मनोनेत्रांसमोर तरळू लागतात आणि पर्यटकांची दृष्टी नकळत विस्फारीत होते. उर अभिमानाने फुगते व ते तेथील वीरपुरुषांच्या त्या स्मृतीचिन्हांसमोर नतमस्तक होतात.

इ. स. १३०३ साली 'चितूरगडावर' प्रथम आक्रमण करून अल्लाउद्दीन खिलजीने तो उडवून दिला अर्थातच, तेव्हांच्या तेथील स्त्रीवर्गाने 'शीलरक्षणार्थ' त्या किल्ल्याच्याच तळघरात 'जोहार' मांडून आग लावून त्यातच त्यांनी एकत्र प्रवेश केला. अग्निकाष्ठे भक्षण केली. हे वर्णन जेव्हा मार्गदर्शकाकडून पर्यटकाला ऐकायला मिळते तेव्हा त्या देहत्यागी स्त्रीयांच्या पुढेही पर्यटक नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत.

अल्लाउद्दीन खिलजीने इ. स. १३०३ पूर्वीही येथे छोटे-छोटे हल्ले करून जनतेचा छळ करण्याचे डाव टाकले होते. पण, रजपूत ही जातच कडवी हिंदुत्ववादी. त्यांनी मुसलमानांशी निकराने चार हात करून त्यांना प्रत्येक वेळी हाकलून दिले होते. पण १३०३ मधला हल्ला शेवटचा आणि भयानक होता. त्यामध्ये तो किल्ला उडवूनच दिला होता, असा संदर्भ आहे.