Chhatrapati Shivaji Maharajanche Avatarkarya | S. R. Sunthankar | The Divine Mission and Spiritual Legacy of the Maratha King
Chhatrapati Shivaji Maharaj book, Avatarkarya of Shivaji, S. R. Sunthankar, Shivaji history Marathi, Shivaji Maharaj biography,
Discover the divine purpose, the moral power, and the unbreakable spirit of the great Maratha King—Chhatrapati Shivaji Maharaj—the warrior who turned devotion into revolution and laid the foundation of a new India.
Chhatrapati Shivaji Maharajanche Avatarkarya छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतारकार्य By S R Sunthankar

Chhatrapati Shivaji Maharajanche Avatarkarya (छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतारकार्य) By S R Sunthankar

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0

छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतारकार्य 

 

           छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा किंवा राजा नव्हते तर ते एका दिव्य कार्याचे सजीव प्रतीक होते. त्यांच्या पराक्रमाने, धर्मनिष्ठेने आणि दूरदृष्टीने त्यांनी शतकानुशतके गुलामगिरीत दबलेल्या हिंदू संस्कृतीला पुन्हा नवजीवन दिले आणि स्वराज्याचा पाया घातला.

           इतिहासकार स. रं. सुंठणकर यांनी शास्त्रीय पद्धतीने दाखवले आहे की शिवाजी महाराजांचे जीवन हे एक "अवतारकार्य" होते जे धर्म, नीतिमत्ता आणि राष्ट्रीय एकतेचा दीप पुन्हा प्रज्वलित करणारे होते.हे पुस्तक या दिव्य कार्याचा गूढ आणि गाभा उलगडते. धर्मसंस्थापन, न्यायसंरक्षण आणि राष्ट्रजागृतीचे कार्य श्रद्धेने, शौर्याने आणि सत्याच्या मार्गावर केले असून  एक माणूस संपूर्ण युग बदलू शकतो  हे  सत्य शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात दडलेली शक्ती आहे आणि त्यामुळे  ती नीतिमूल्ये आणि ती राष्ट्रप्रेरणा आजही तितकीच जिवंत आहेत, म्हणूनच इतिहासाच्या पानांतून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून लेखक दाखवतात की शिवाजी महाराजांचे जीवन हे एक “अवतारकार्य” होते.

जदुनाथ सरकार म्हणतात “शिवाजींनी दाखवून दिले की हिंदुधर्माचे झाड मृत नाही ! ! !

ते पुन्हा उभे राहू शकते, आकाशाकडे डोके वर करू शकते.” हे तितकच खरं आहे . 

शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ राजसत्तेचा नाही, तर एका युगजागृतीचा, एका धर्मप्रबोधनाचा आणि एका अवतारकार्याचा इतिहास आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही ! ! !

मुख्य वैशिष्ट्ये:

आध्यात्मिक दृष्टीकोन : शिवाजी महाराजांच्या जीवनाचे दिव्य कार्य म्हणून सखोल विश्लेषण.

ऐतिहासिक प्रामाणिकता : समकालीन पुरावे आणि ग्रंथसंदर्भांवर आधारित मांडणी.

प्रेरणादायी कथन : शिवाजींच्या शौर्य, नीतिमत्ता आणि राष्ट्रभक्तीची जिवंत मांडणी.

सुगम वाचन : विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त.

संस्कृतीचा अभिमान : धर्म, स्वातंत्र्य आणि एकतेचा संदेश पुन्हा उजळविणारे पुस्तक.