Chatur Madhavrao by Govind Narayan Datarshastri

Regular price Rs. 240.00
Sale price Rs. 240.00 Regular price
Save 0

चतुर माधवराव

गो. ना. दातार यांनी या चतुर माधवरावांच्या तेरा कथा राजापूरला रहायला गेल्यावर १९३० साली लिहील्या. कॉनन डॉयलच्या कथेत शेरलॉक होम्स हा गुप्तेहर व वैटसन हा त्याचा मदतनीस असायचा. त्यांचीच रुपेदातारांनी माधवराव व बळवंतराव यांच्या नावाने योजली आहेत. बळवंतराव सर्वसामान्य बुद्धीचा असल्यानेरहस्य ताबडतोब त्याच्या लक्षात येत नाही. या कथा शेरलॉक होम्सच्या कथांची भाषांतरेनाहीत. शेरलॉक होम्सच्या धर्मीवर केलेल्या या स्वतंत्र रचना आहेत. गो. ना. दातार मुंबईत राहिलेले असल्यामुळे त्यावेळचे वातारण बरोबर उल्लेखिले आहे. कॉनन डॉईल यांनी शेरलॉक होम्सवर ५९ कथा लिहील्या. पण येथे गो. ना. दातारांनी फक्त तेराच कथा लिहील्या आहेत. प्रत्येक कथेत रहस्याचा उलगडा कथेच्या शेवटी होतोच. या कथा मुंबईत व कोकणातील राजापूर येथे घडतात त्यामुळे शेरलॉक होम्सच्या कथेपेक्षा या कथा लोकांना जास्त आवडतात. कारण आपल्या घरातीलच वाटतात. चातुर्य कथांची आवड असणाऱ्या वाचकांना भारतीय वातावरणातील या चातुर्यकथा नक्कीच आवडतील.