Chatrapati Sambhaji Maharaj Ani Chatrapati Rajaram Maharaj( श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले छत्रपती राजाराम यांची चरित्रे ) by Kashinath Narayan Sane
'श्रीमंत छत्रपती धाकटे शाहू महाराज ऊर्फ आबासाहेब सातारकर' ह्यांच्या आज्ञेवरून त्यांचे चिटणीस रा. मल्हार रामराव यांनी मागील कागदपत्रांचे दाखले पाहून व श्रुत असलेल्या माहितीवरून इ. स. १८१०-११ ह्या साली शककर्ते थोरले शिवाजी महाराजांपासून तो धाकटे शाहू महाराजांपर्यंत सर्व महाराजांची चरित्रे लिहिली. खुद्द मल्हार रामराव व त्यांचे पूर्वज हे मोठे हुदेदार असून महाराजांच्या अतिनिकट वागणारे असल्यामुळे सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यांत होती, आणि परंपरागत आलेली आतील बारीक-बारीक माहितीही त्यास इतरांपेक्षा विशेष होती. ह्यावरून अशी चरित्रे लिहावयास ते योग्य होते हे सांगणे नको. हा चरित्ररूपी ग्रंथ सविस्तर लिहिल्यामुळे किती प्रचंड सोय झाली हे खाली दिलेल्या मजकुरावरून कळेल.
हा ग्रंथ, म्हणजे मराठी साम्राज्याचा इतिहास, जर जन्मास न येता, तर मराठी राज्याची हकिकत साद्यंत कळण्याची मोठी मुष्किली पडली असती. असो. ह्या ग्रंथांतील ही संभाजीमहाराज व थोरले राजाराममहाराज यांची चरित्रे आहेत.