Chatrapati Rajaram Maharaj (छत्रपती राजाराम महाराज) By Dr P S Jagatap
छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड १२ फेब्रुवारी १६८९ ते २ जून १७०० पर्यंतचा आहे. स्वराज्यावर दुःखाचे सावट असतांना छत्रपती राजारामांना स्वराज्याच्या राजकीय कारभाराची सूत्रे हाती घ्यावी लागली. या कालखंडातच औरंगजेबाच्या सैन्याने महाराजांच्या स्वराज्यात अत्याचाराचा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे छत्रपती राजारामांना रायगड सोडून कर्नाटकातील जिंजीच्या किल्ल्यात आश्रय घ्यावा लागला. छत्रपती राजारामांनी इतक्या दूर अंतरावर राहून आपल्या स्वराज्यातील मातब्बर सैन्य, सरदार, सेनापती व सरसेनापती अशा निष्ठावान सेवकांकडून औरंगजेबाच्या विविध आक्रमणांचा प्रतिकार केला व स्वराज्याची व्यवस्था उत्तमरीतीने पार पाडली. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक जनकल्याणकारी योजनाही राबविल्या व स्वराज्यातील सर्वसामान्य रयतेला न्याय मिळवून दिला. त्यांना फक्त ११ वर्षेच राज्यकारभार पाहण्यास अवधी मिळाला तरीही त्यांची कारकिर्द जनहिताच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे, याचा जिज्ञासू वाचकांना प्रत्यय येईल याची खात्री आहे.