Chandragupta (Va Chanakya) by Hari Narayan Apte

Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price

चंद्रगुप्त (व चाणक्य)


महाराष्ट्राचे लाडके कादंबरीकार हरि नारायण आपटे यांनी १९०२ ते १९०४ या कालावधीत त्यांनी संपादिलेल्या 'करमणूकया मासिकातून चंद्रगुप्त ही कादंबरी क्रमशः प्रसिद्ध केली. कादंबरी प्रसिद्ध होत असताना, 'करमणूक'चा पुढचा अंक केव्हा येतो व आपण पुढचा भाग केव्हा वाचतो अशी वाचक उत्कंठतेने वाट पाहत असत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या हिंदुस्थानचे दर्शन घडविणारी ही कादंबरी नंतरच्या काळात लोकप्रिय झाली यात नवल नाही. १९६७ पर्यंत या कादंबरीच्या आठ आवृत्त्या झाल्या आणि एकूण १७ हजार प्रति विकल्या गेल्या. परंतु नवीन पिढीला या कादंबरीची पुरेशी ओळख नाही म्हणून ही कादंबरी मूळ स्वरूपात वरदा प्रकाशन तर्फे पुन्हा सादर करीत आहोत. भारताचा ज्ञात इतिहास चंद्रगुप्तापासूनच सुरु होतो. परंतु या कालखंडाचा स्पष्ट इतिहास सांगणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. अशा वेळी तत्कालीन इतिहासाचा मागोवा त्या काळच्या साहित्यातून, लोककथांतून, आख्यायिकांतून घ्यावा लागतो, हे ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी दाखवून दिलेलेच आहे. हरि नारायण आपटे यांनी या दिशेनेच प्रयत्न करून कादंबरीचे संविधानक तयार केले. अर्थात अशा वेळी पुरावे द्यायचे नसल्यामुळे कादंबरीकार थोडे बहुत स्वातंत्र्य घेतोच, तसे स्वातंत्र्य हरि नारायण आपटे यांनी जरूर घेतले आहे.

चंद्रगुप्त मोर्य हा सम्राट, आर्य चाणक्यानेच निर्माण केला आहे. म्हणून चंद्रगुप्तावरील कादंबरी असो वा नाटक, त्यात चाणक्याला प्राधान्य मिळणे सहजच आहे.