Bandhasingh Bahadur(बंदासिंह बहादूर) By Subhash Kale

Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price
Save 0

वारंवार होणाऱ्या परकीय आक्रमणापासून भारतीय संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे, तिचे अस्तित्व टिकविले पाहिजे. स्वत्व राखले पाहिजे. या वैचारिक प्रबोधनाबरोबरच आक्रमणाचा प्रतिकार करण्याची त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा गुरुनानकदेवांनी दिली. गुरुनानकदेवांनी स्थापन केलेला शीख धर्म ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती तर ती सामाजिक राष्ट्रीय चळवळ होती. याच चळवळीला दहावे गुरु गोविंदसिंह यांनी सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले. एक अभ्यासक सतींदर सिंग यांच्या मते ब्रिटिशांनी फाशी दिलेल्या १२१ हुतात्म्यांपैकी ५३ शीख होते. अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या एकूण २२६४ स्वातंत्र्य सैनिकांपैकी २१४५ शीख होते. जालियनवाला बाग हत्याकांडात बळी पडलेल्या १३०२ व्यक्तींपैकी ७९९ शीख होते. ग्यानसिंग संधू यांच्या मते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत २१७५ भारतीयांनी हौतात्म्य पत्करले त्यापैकी १५५७ म्हणजे ७५ टक्के शीख होते. अंदमानात केलेल्या २६४६ पैकी २१४७ म्हणजे ८० टक्के शीख होते. फाशी देण्यात आलेल्या २१७ पैकी ९२ म्हणजे ८० टक्के शीख होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेतील वीस हजार सैनिकांपैकी बारा हजार सैनिक शीख होते. सतिंदर सिंग आणि ग्यानसिंग संधू यांनी दिलेली आकडेवारी शंभर टक्के मान्य नाही केली तरी शिखांचे भारताच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाण केवळ दीड ते दोन टक्के असताना स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी केलेले बलिदान, सोसलेला कारावास याचे प्रमाण अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होते, ही वस्तुस्थिती कोणालाही मान्य करावीच लागेल....