Balkumaransathi Valmiki Ramayan by Kedar Kelkar

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price
Save 0

बालकुमारांसाठी वाल्मिकी रामायण

आपल्या देशात राजेशाही राजवट चालू असताना अनेक राजे आपली राज्ये भारतीय संस्कृती' युक्त धर्माच्या पायावर वर्षानुवर्षे सांभाळून आणि त्यामुळे ' कीर्तिवंत होऊन गेले ही आपली संस्कृती रामायण काळापासून प्रकर्षाने उजेडात आली ती ' प्रभू श्री रामचंद्र ' यांच्या संस्कृतीबद्ध अश्याच आचरणामुळे हे अगदी स्वच्छ आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र यांचे चारित्र्य नजरेसमोर ठेवून ऋषी वाल्मिकी यांनी ' रामायणा' ची रचना केली. आपल्या देशातले मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासह सर्व जगप्रसिध्द राजे आपल्या बालपणात रामायण आणि त्यानंतर घडलेल्या महाभारत ह्या दोन्ही ' भारतीय संस्कृतीने' ओतप्रोत भरलेल्या ग्रंथातील सर्व कथा आपल्या पालक आणि गुरू यांच्या मुखातून ऐकून आणि पुढे स्वतः वाचन-मनन करूनच आपला राज्यकारभार चालवून जगप्रसिध्द होऊन गेले....

आपल्या आजच्या नव्या पिढीतील बाल - शिशु - कुमार युवक अश्या सर्वच संस्कारक्षम गटातील मुला मुलींना डोळ्यापुढे ठेवून ह्या पुस्तकाचे लेखन केले असून ' वाल्मिकी रामायणाचे ' मूळ मराठी ग्रंथ वाचणे जड जातील आणि, ' रामायण कसे घडले' यांसह त्यातली व्यक्तिमत्वे कळण्यासाठी फार लांबण न लावता ह्यातील कथा थोडक्यात लिहिल्या आहेत अश्यावेळी, मोठ्या हिंदी आणि मराठी ग्रंथांचाही आधार घेतला आहे, त्यामुळे ह्या कथा सर्वांना भावतील अशी आशा आहे.

- केदार केळकर- पुणे 4