Balak V Palak (बालक व पालक) By H.A.Bhave
बालकांचा विकास निरनिराळ्या वयात निरनिराळ्या प्रकारे होतो. सहावे वर्ष पूर्ण झाल्यावर बालक शाळेत प्रवेश करते. मग सहा वर्षांनंतरचा काळ बालकाच्या जीवनात खळबळीचा जातो. सहा वर्षांचा बालक शाळेत जातो, याचा अर्थ कुटुंबातील मर्यादीत जग सोडून बाहेरच्या विशाल जगात सामील होतो. त्याला खेळायला सवंगडी मिळतात व त्याचे या जगातील स्वतंत्र जीवन सुरू होते. बालकांच्या जीवनात पालकांची म्हणजे आई-बाबांची दोघांची कामे महत्त्वाची असतात. आपली मुलेबाळे चमकावी, यशस्वी व्हावी असे सर्वांनाच वाटते. पण बालकांच्या यशात पालकांचाही मोठा वाटा असतो पालकांनी प्रथम यशस्वी आई - बाप होणे जरूरीचे आहे. बालकाचा विकास चांगला व्हावा असे वाटत असेल तर, त्या घरात अखंड शांतता व सुख असले पाहिजे. घरातील सुखमय किंवा दुखमय वातावरणाचा फायदा किंवा तोटा बालकांनाच भोगावा लागतो. घरातील वास्तव्य जास्त काळ असते. त्याचें बालक शाळेत खूप वेळ असला तरी त्याचे दोन्ही ठिकाणचे वर्तन एकमेकांना पूरक असायला हवे. या गोष्टीचा विचार घर आणि शाळा या प्रकरणात केला आहे. सर्व बालके गुणी आणि गोंडस नसतात. अनेक घरात बालकांना विवंचना असतात. काही-काही बालकांना द्रव्यार्जनही करावे लागते. बालकाच्या अबोध मनाला भय भेडसावून टाकते. मोठ्या माणसाप्रमाणे बालकालाही निराशा व चिंता घेरते. त्याकडेही पालक व शिक्षक यांना लक्ष पुरवावे लागते.बालके कधीही स्वस्थ बसत नाहीत. त्यांची सतत चळवळ चालू असते. त्यांना ज एखादा छंद या वयात लावल्यास त्या छंदात त्यांचा वेळ चांगला जातो. इतक्या लहान बालकांना पॉकेटमनी द्यावा किंवा नाही, या विषयी मतभिन्नता आढळते. त्याचाही विचार या पुस्तकात केला आहे. बालकांच्या शरिराचा विकास, आजारपण नसेल तरच चांगला होतो. त्याविषयी येथे विचार केला आहे. बालकांना झोप व विश्रांती यांची जरूर असते. अनेकदा बालकांना अपघात होतो ती आजारी पडतात. अशावेळी त्यांची सेवा, सुश्रुषा करावी लागते. यातूनच बालकांचे व पालकांचे कर्तव्य काय आहे हे समजून येईल