Badodyache Rajyakarte (बडोद्याचे राज्यकर्ते) By Vinayak B Paranjape

Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price
Save 0
'सन १८७९' च्या ऑगस्ट महिन्यात ह्या संदर्भग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती, तत्कालीन ब्रिटिश अधिकारी 'एफ.ए.एम इलियट ' यांनी.. भारतीय इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास करून, भारतातील ब्रिटिश राजकारणात वापर करण्यासाठी हे एक ' Rulers of Baroda ' ह्या नावाचे खास इंग्रजी संदर्भपुस्तक लिहिले होते, आणि त्यासाठी बडोद्याच्या बहुतेक सर्व राज्यकर्त्यांची माहिती मोठ्याच परिश्रमाने त्याने ते लिहून तयार केले होते.
     ब्रिटिशांची भारतातील सत्ता लोपल्यावर 'बडोदा संस्थान' चे राजे सयाजीराव गायकवाड यांनी ह्या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर करण्याचे काम त्याच काळी सन १८७९ च्या काळात सोपविले होते आणि परांजपे यांनी ते लगेच उत्कृष्ठपणे पार पाडले.
     'भारतीय इतिहास' ह्या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, लेखक, संशोधक आणि आजकाल 'चित्रपट-निर्माते' या मंडळींसाठी 'जुनी दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या वरदा प्रकाशनाच्या धोरणानुसार' हे दुर्मिळ संदर्भपुस्तक म्हणजे इंग्रजीत 'बेकन-ब्रेड' ठरावे. मुळातच बडोदा संस्थान हे 'महाराज सयाजीराव गायकवाड' ह्या मराठी व्यक्तीच्या हातात आले असल्याने तेथे 'मराठी सरदार आणि पेशवेकालीन सरदार यांची सयाजीराव यांच्याही पूर्वीपासून राजकारणानिमित्ताने नित्य 'ये-जा' होत असे हे ह्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून नजर फिरवल्यास सहज लक्षात येते. वाचक ह्या दुर्मिळ संदर्भग्रंथाचे स्वागत करतील अशी आशा वाटते