By H A Bhave | Motivational Marathi Book
Self Help  Personal Growth & Self Improvement marathi book
motivational marathi books

Atmavikasachi Payabharani |आत्मविकासाची पायाभरणी | Foundation of Self Development|Personal growth| time management|self-discipline | motivation | Marathi Books|

Regular price Rs. 30.00
Sale price Rs. 30.00 Regular price
Save 0

आत्मविकासाची पायाभरणी

यश अपघाताने मिळत नाही ते घडवावे लागते.आत्मविकासाची पायाभरणी हे पुस्तक प्रत्येक माणसाच्या हातात असलेल्या सर्वात मौल्यवान भांडवलावर वेळइच्छाशक्ती आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकते. आत्मविकास हा बाहेरून मिळत नाही; तो  स्वतःलाच घडवावा लागतो, हे लेखक ठामपणे सांगतात.

“आम्हाला वेळ नाही” ही तक्रार करणाऱ्यांना हे पुस्तक विचार करायला भाग पाडते. दिवसाचे चोवीस तास हेच खरे भांडवल आहे.  त्याचा योग्य वापर केल्याशिवाय यश शक्य नाही. कौशल्य, सातत्य, परिश्रम आणि योग्य संधींचा पुरेपूर उपयोग कसा करायचा, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या पुस्तकात मिळते.

उच्च शिक्षणाची संधी न मिळालेल्या तरुणांपासून ते जीवनात पुढे जाण्याची आस असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक स्वतःच्या परिस्थितीचा स्वामी होण्याची प्रेरणा देते. एकाग्र चित्ताने काम करा, आत्मविकासाची पायाभरणी नक्कीच होईल.