Aitihasic Dantkatha (ऐतिहासिक दंतकथा 2 ) By Prabhakar Bhave
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 70.00
Regular price
Save 0
ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करताना अनेक गंमतीदार हकीगती सापडतात, त्या चटकदार असतात. त्यातील काही हकीगती पूर्वीपासूनच साऱ्यांना माहिती असतात. तरीही त्यांची गोडी अवीट असते.
"दंतकथांचे इतिहास संशोधनातील स्थान" ह्याबद्दल विचारवंत, विद्वान अन् संशोधक कुठल्याही निर्णयापर्यंत येवोत, परंतु ह्या दंतकथांची नितांत आवश्यकता सामाजिक प्रलोभन व समाजाची स्वातंत्र्याची ईर्षा जागृत ठेवण्यासाठी असते हे सत्य नाकारून चालणार नाही. भारताचा इतिहास मग तो कुठल्याही कालखंडाचा असो, त्यातून तत्कालीन दंतकथा वेगळ्या करता येणार नाहीत अथवा नष्टही करता येणार नाहीत. कारण ह्या दंतकथांचा जनसामान्यांच्या मनावर फार मोठा पगडा बसलेला असतो.
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा, ही कथा खरोखरच कुणा एका महान प्रतिभावंताचे इतिहासाला लाभलेले एक महान लेणं आहे. यात संशय नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व त्यांची महानता कितीतरी पटीने वाढविण्यास ही दंतकथा नक्कीच कारणीभूत ठरली आहे. एका यवनी युवतीला साडीचोळी देऊन तिची सन्मानपूर्वक पाठवणी करणे हे तत्कालीन सामाजिक निंद्य प्रवृत्तींच्या मानाने केवढेतरी पुरोगामी पाऊल महाराजांनी उचलल्याचा हा दाखला आहे. केवळ दंतकथा म्हणून ही मोडीत काढता येणार नाही. इतके ह्या दंतकथेचे महत्त्व अनन्य साधारण आहे.