Aithihasik Striya By Dinakar Sakharam Varde

Regular price Rs. 250.00
Sale price Rs. 250.00 Regular price
Save 0

आपल्या देशात ‘रामायण-महाभारत' काळापासून 'स्त्री'- पुरुषांसमान मानण्याइतकी ती धाडसी होती ह्याची अनेक उदाहरणे आहेत, तसेच अभ्यास केला तर, त्या काळातल्या आणखीही 'कर्तत्ववान' अशा स्त्रिया उजेडात येतील. रामायणकाळात राणी कैकयीने रथात दशरथाबरोबरीने युद्धात एका सहाय्यकाची भूमिका वठवताना आपल्या हाताची 'आरी' (axle) करून हलणारे रथचक्र फिरतेच ठेवले आणि वेळ साधली ! युद्ध जिंकले !! हे काम 'साधे' नव्हते... महाभारतकाळात 'विराटाच्या' राज्यात सैरंध्री नावाची दासी बनून रहाताना तेथील 'कीचक' नावाच्या राक्षसी सेनापतीला कायमची अद्दल द्रौपदीने भीमसेनाकडून घडविली. अन हेही काम स्त्रीला मानसिकदृष्ट्या धाडसाचेच ! त्यामुळे, त्या दोघींना त्यांच्या काळात पुरुषांसमान हक्क मिळाले, मान मिळाला. त्या काळापूर्वीही स्त्रिया 'कर्तृत्व' गाजवून गेल्या असतीलही त्यांचाही अभ्यास झाला तर कळेल.पण, त्या काळानंतर एका प्रदीर्घ कालखंडानंतर भारतातल्या समाजव्यवस्थेवर म्हणण्यासारखे नियंत्रण नसावे. मग, एकदम 'सम्राट अशोक याचा उदय झाला' मग राजवटीही बदलत गेल्या, मगमुसलमानी, मराठेशाही - शिवकालीन, मग पेशवाई मग तर ब्रिटिशकाळ पुढे १९४७ ला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्ती असे एकंदर भारतीय इतिहासाचे धावते वर्णन करता येईल. ह्या एकूण इतिहासात भारतात आपोआपच भाषावार प्रांतरचना झाली आणि राजेशाहीही येऊन गेली त्या काळातही स्त्रिया आपले कर्तव्य उजळून गेल्या त्याच काळात आपली 'भारतमाता' सर्वच दृष्टीने 'सुजलाम-सुफलाम' होती. स्त्री-पुरुष समान हक्काने समाजात वावरत असत.गेल्या शतकातले एक वैचारिक लेखक 'दिनकर सखाराम वर्दे' यांच्या 'ऐतिहासिक स्त्रिया' ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका सहज पाहिली तरी त्यावरून आपल्या देशातल्या त्या काळातल्या पाकिस्तान ते महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी प्रांतापर्यंत राजेशाहीचाच काळ दिसतो आणि प्रत्येक यशस्वी राजामागे एक 'स्त्री' असल्याची जाणीव होते आणि अशाच काळापासून शिवशाहीच्या काळापर्यंत 'कर्तृत्वाने गाजलेल्या' स्त्रियांचे दर्शन घडते.इच्छुक-वाचक, अभ्यासक, संशोधक ह्यांना ह्या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल हे नक्की.