Abhay Soubhagya Savitri Bhaskarrao Bhave Nargundkar by Nayantara Desai
अभय सौभाग्य
सावित्री भास्करराव भावे - नरगुंदकर
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री अर्थात त्याची पत्नीच असते? अशी एक गर्वभरित भावना अनेक चरित्रे वाचताना हुशार वाचकांच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाही. आणि अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आपल्या ह्या हिंदुस्थानात शोधल्यावर सापडतील. असेच एक व्यक्तिमत्व ह्या कादंबरिकेच्या लेखिका नयनतारा देसाईंना गवसले. ते म्हणजेच 'सावित्री भास्करराव भावे-नरगुंदकर'.
१८५७ च्या बंडाचा वणवा मध्यप्रदेशात भडकला आणि संपूर्ण देशभर त्याची झळ पसरू लागून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रदेशातही - या वणव्याचे लोण पसरू लागले. आणि तशीच ती एकंदर योजना बांधलेली होती की ज्यामुळे एकाच तडाख्यात इंग्रज देश सोडून पळाले पाहिजेत. ह्या सीमाप्रदेशात 'नरगुंद' नावाचे संस्थान होते. आणि तिथले संस्थानिक राजे श्री भास्करराव भावे आणि ही सावित्री त्यांची अर्धांगिनी. ही सावित्री जिने जणू भास्कररावांच्या जीवनवाटेवर चालण्यासाठी त्यांनी उचललेल्या 'प्रत्येक पावलावर' स्फूर्तिबलाची मात्राच दिली. याबाबतीत या कादंबरीकेत सावित्रीबाई यांच्या तोंडी नयनताराबाईंनी फार सुंदर वाक्य घातले आहे, त्या भास्कररावांना म्हणतात, 'त्यात काय ! तुम्ही जय्यत तयारीनिशी इंग्रजांवर तुटून पडा.. तुमच्यासारख्या पराक्रमी वीराला भय कशाचं?'.
ह्या 'सावित्री भास्करराव भावे' यांचे हे कादंबरीकारुप चरित्र वाचून आजच्या प्रत्येक विद्यार्थीनीने आपल्या पतीच्या जीवनात मनाची शक्ती वाढवली पाहिजे असेच हे चरित्र आहे.