A JournyTo The Center Of The Earth (ए जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ)By Vilas Phadake|Adventure|Science Fiction|Marathi science fiction
"ए जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ"
ही फ्रेंच लेखक ज्यूल्स व्हर्न यांनी 1864 साली लिहिलेली जगप्रसिद्ध विज्ञानकथा आहे .आता मराठी वाचकांसाठी विलास फडके यांनी सुंदर अनुवादात सादर केली आहे. जर्मन प्राध्यापक हार्डविग यांचा दावा असतो की एका ज्वालामुखीच्या विवरातून पृथ्वीच्या पोटात अगदी मध्यभागी जाता येते. आपला दावा सिद्ध करण्यासाठी ते स्वतः, त्यांचा भाचा हॅरी आणि वाटाड्या हॅन्स अशा तिघांचा अद्भुत प्रवास सुरू होतो.
आईसलँडमधील ज्वालामुखीतून पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करताना त्यांना नैसर्गिक आपत्ती, प्राचीन प्राणी, आणि गूढ भूगर्भीय जगाचा सामना करावा लागतो. अखेरीस ते पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला दक्षिण इटलीतील एका पर्वतातून बाहेर पडतात!
ही केवळ प्रवासकथा नाही, तर मानवी धाडस, जिज्ञासा, आणि विज्ञाननिष्ठतेचा अद्वितीय दस्तऐवज आहे.
या कादंबरीवर आधारित दोन चित्रपट आणि एक दूरदर्शन मालिका देखील प्रसारित झाली होती, ज्यामुळे तिची लोकप्रियता जगभर पसरली. विज्ञान, साहस आणि कल्पनाशक्ती यांचा अद्भुत संगम, भूगर्भशास्त्र, भूगोल आणि मानवाची जिज्ञासा यांचं प्रभावी चित्रण यांमुळे आणि विलास फडके यांच्या भाषांतरातून साकारलेली ही कालातीत साहसकथा वाचकांना एका वेगळ्या जगात घेऊन जाते.