1857 Bandacha Vanawa By Shree Parshuram Sadashiv Desai
१८५७ बंडाचा वणवा
प्रस्तुत कादंबरी इ. स. 1857 साली आपल्या देशात जे बंड झाले व त्यामुळे नवीन कंपनी सरकारने येथे जी राजसत्ता स्थापित केली, ती नष्ट करण्याच्या हेतूने शिपाई लोकांनी हा "बंडाचा वणवा' सर्व हिंदुस्थानभर भडकविला होता, व त्या वणव्यात आंग्लसत्ता भाजून काढावी, असा त्या बंडवाल्यांचा व त्या बंडास साह्य करणाऱ्यांचा अंतःस्थ हेतू होता. पण अशी राज्यक्रांती घडवून आणून, नवीन हिंदवी राज्य पुनः स्थापन करणाऱ्यांचे हेतू सामुदायिक बलाने व एकजुटीने न झाल्याने, व इंग्रजांचे यत्न व जूट मोठी दांडगी व करारी बाण्याची ठरल्याने, इंग्रजांनी या बंडवाल्यांचा पुरा मोड केला व देशात नवीन राज्यशकट चालू करून शांतता प्रस्थापित केली.
ब्रिटिश कंपनी सरकारच्या जुलुमांची काही सैनिकांवर पडलेली ठिणगी कशा प्रकारे पेट घेत संपूर्ण हिंदुस्थान भर वणव्याचे रूप धारण करत गेली हा सर्व प्रवास वाचकाला खिळवून ठेवणारा आणि स्तब्ध करणारा आहे.
ब्रिटिश कंपनी सरकारने या वणव्याचा बिमोड करून नवी राजसत्ता प्रस्थापित केली असली तरी हिंदुस्थानच्या क्रांतीचा हा भडका संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरित करणारा होता. या वणव्यात आहुती म्हणून समर्पित झालेल्या प्रत्येक सैनिकाचे स्थान धृव ताऱ्याप्रमाणे अढळ आणि अबाधीत आहे. या ऐतिहासिक कादंबरी मध्ये लेखकाने प्रस्तुत केलेल्या प्रसंगांचे वर्णन अतिशय रोमांचकारी आणि अंगावर थरार आणणारे आहे. देशभक्तीने प्रेरीत करणारी ही कादंबरी 'वरदा प्रकाशनाने' प्रकाशित केलेली आहे. ही कादंबरी प्रत्येक वाचकाला १८५७ च्या त्या कालखंडात घेऊन जाण्याचा अनुभव करून देण्यास पूर्णपणे समर्थ आहे.